नेपाळमधील विनाशकारी पुराचे खरे कारण अखेर पुढे, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा..
नेपाळमध्ये पुराने हाहाकार माजवला. त्यातच शास्त्रज्ञांनी मोठा खुलासा केला. नेपाळमध्ये घडलेली घटना नक्की कशी झाली आणि यामागे कारण काय आहे, हे देखील सांगितले. नेपाळमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

नेपाळ आणि तिबेट यांच्या सीमावर्ती भागात विनाशकारी पुराने हाहाकार माजवला. हिमनदी कोसळल्याची घटना घडली. यादरम्यानच अनेक आरोप केले जात आहेत. चीनवर आरोप केले जात आहेत. धक्कादायक फोटो आणि व्हिडीओही पुढे आली आहेत. नेपाळमध्ये इतका मोठा पूर नक्की का आला? याबाबत आता शास्त्रज्ञांनी अत्यंत मोठा खुलासा केला. शास्त्रज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हिमनदी कोसळल्याने बर्फ वेगाने वितळला असावा, हा मोठा अंदाज वर्तवण्यात आला. सुरुवातीच्या अहवालांनुसार, असे सांगितले जात होते की, भुकंपामुळे मोठी दरड कोसळल्याने ही घटना घडली असावी. पण यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (USGS) स्पष्ट केले की, ही दुर्घटना हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे घडली. नेपाळमध्ये अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत.
यूएसजीएसची आकडेवारी आणि विश्लेषण करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, दरीच्या कोसळलेल्या एका प्रचंड हिमनदीचा आघात 5.2 तीव्रतेच्या भूकंपा इतका होता. डंडी विद्यापीठातील हिमनद-अभ्यासक अर्थात ग्लेशियोलॉजिस्ट डॉ. सायमन कुक यांनी बीबीसीला बोलताना सांगितले की, त्यांच्या पथकाला नेपाळमधील लाँगटांग लिरुंग शिखराजवळील एका हिमनदाचा खालचा भाग तुटून वेगळा झाल्याचे आढळून आले आहे.
विशेष म्हणजे ही घटना पूरग्रस्त भागापासून पश्चिमेकडे 15 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हिमनदीचा भाग वायव्य दिशेला तुटला, ज्यानंतर पश्चिमेकडे नदीत कोसळला. हा बर्फ खडकाळ भागात कोसळला आणि वितळला. ज्यामुळे नदीला अचानक मोठा पूर आला. यदरम्यान प्रवाहासोबत गाळ आणि मोठे दगडेही वाहून गेली. पाण्याचा प्रचंड असा वेग होता.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील पृथ्वी विज्ञान विषयाचे प्राध्यापक माईक सर्ल यांनीही मोठी माहिती दिली. त्यांनी म्हटले की, भूस्खलनापासून ते पुरापर्यंतची ही संपूर्ण प्रक्रिया काही तास किंवा अगदी अनेक दिवसही चालू राहिली असावी. म्हणजेच नेपाळमध्ये अचानक पूर आला नाही. भूस्खलनाची प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू असावी. नेपाळमधील पुढे येणारे फोटो हे अंगावर काटा आणणारी आहेत. सर्वकाही या पुरात वाहून जाताना दिसत आहे. भारतातवरही मोठे संकट आहे.