AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! हा मुस्लीम देश मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 9 वर्षे करणार

अनेक देशांमध्ये मुलींच्या लग्नाचे वय हे साधारण पणे १८ वर्ष आहे. यानंतरच मुलींचं लग्न करता येणार आहे. याआधी अनेक देशात बाल विवाहाची प्रथा होती. पण नंतर ती बंद झाली. पण आता या देशाने पुन्हा एकदा लग्नाचे वय ९ वर्षांनी कमी करण्यासाठी विधेयक आणलं आहे. ज्याला कडाडून विरोध होत आहे.

धक्कादायक ! हा मुस्लीम देश मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 9 वर्षे करणार
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 09, 2024 | 3:31 PM
Share

भारतात आणि बऱ्याच देशांमध्ये मुलींसाठी लग्नाचे वय १८ वर्ष आहे. या वयात मुली सज्ञान होतात. त्यामुळेच त्यांच्यासाठी १८ वर्ष हे वय निश्चित करण्यात आले आहे. याआधी बालविवाहाची प्रथा होती. बालविवाह झाल्यानंतर महिलांना लगेचच संसारात गुंतावे लागत होते. त्यामुळे महिलांना आपल्या पायावर उभं राहणं आणि सक्षम होता येत नव्हतं. त्यामुळेच पुढे जाऊन हे वय १८ वर्ष निश्चित करण्यात आले होते. आता एका मुस्लीम देशात मुलींचे लग्नासाठीचे वय फक्त ९ वर्ष करण्याचा प्रस्ताव आहे. इतकंच नाही तर संसदेत त्यासाठी विधेयक देखील मांडण्यात आले आहे. कोणता आहे तो देश सविस्तर जाणून घेऊयात.

संसदेत आणलं विधेयक

इराकच्या संसदेत मुलींचे लग्नाचे वय कमी करण्यासाठी इराकच्या संसदेत विधेयक मांडण्यात आले आहे. यामध्ये मुलींचे लग्नाचे वय आणखी 9 वर्षांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या विधेयकावरुन संपूर्ण देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मानवाधिकार संघटनांनी याबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे.

सध्या इराकमध्ये मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षे आहे. पण जर इराकच्या संसदेत विधेयक मंजूर झाले तर मुलींचे वय हे ९ वर्षावर येणार आहे. अशा परिस्थितीत मुलींना १५ वर्षाच्या मुलासोबत विवाह करावा लागणार आहे. यामुळे देशात पुन्हा बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अनेक संघटनांनी केला विरोध

विधेयकाला अनेकांनी विरोध केला आहे. असं केव्याने महिलांचे अधिकार आणि लैगिंक समानता नष्ट होईल. त्यामुळे हे विधेयक संसदेत पास होऊ नये अशी त्यांची मागणी आहे. यामुळे महिलांची प्रगतीही थांबेल अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

मानवी हक्क संघटना, सामाजिक संघटना आणि इतर महिला संघटनांनी या विधेयकाला विरोध केला. या विधेयकामुळे तरुण मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि कल्याणावर निर्बंध येतील. बालविवाहांमुळे मुलींना शाळा सोडावी लागेल. यामुळे अकाली गर्भधारणा आणि घरगुती हिंसाचार देखील वाढले अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

युनिसेफच्या अहवालानुसार, इराकमध्ये 28% मुलींची लग्ने 18 वर्षांच्या आधी होतात. ह्युमन राइट्स वॉचच्या संशोधक साराह सनबर म्हणाल्या की, यामुळे देश आणखी मागे जाईल. इराक वुमेन्स नेटवर्कच्या अमल काबासी यांनीही याला विरोध करत म्हटले की, यामुळे पुरुषांना खूप सूट मिळेल. यामुळे असंख्य मुलींचे भविष्य आणि कल्याण हिरावून घेतले जाऊ शकते. मुलींची जागा लग्नाच्या पोशाखात नसून खेळाच्या मैदानात आणि शाळेत असावी, असे त्या म्हणाल्या. इस्लामिक कायद्याची अंमलबजावणी करणे आणि अल्पवयीन मुलींना अनैतिक संबंधांपासून वाचवणे हा त्याचा उद्देश असल्याचा दावा या विधेयकाच्या समर्थकांनी केला आहे.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...