AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imran Khan : इमरान खानबाबतचं ते सत्य अखेर समोर, बहीण अलिमा यांच्या गौप्यस्फोटानं खळबळ

गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये इमरान खान यांची हत्या करण्यात आली आहे, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहेत, मात्र आता इमरान खान यांची बहीण अलिमा खान यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून, यामुळे खळबळ उडाली आहे.

Imran Khan : इमरान खानबाबतचं ते सत्य अखेर समोर, बहीण अलिमा यांच्या गौप्यस्फोटानं खळबळ
इमरान खान Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 29, 2025 | 4:56 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची हत्या झाल्याच्या बातम्या सातत्यानं समोर येत आहेत, मात्र आता या सर्व अफवा असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान त्यानंतर इमरान खान यांच्या बहीण अलिमा खान यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे.  आम्हाला इमरान खान यांना भेटू दिलं जात नाहीये, तसंच आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाहीये, इमरान खान यांच्या पक्षातील लोक त्यांना ज्या जेलमध्ये ठेवलं आहे, तिथे गेले होते, त्यांची बैठक देखील त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. मात्र जेल प्रशासनाने त्यांना आत जाऊच दिलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की,  गेल्या चार आठवड्यापासून माझ्यासह कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीला इमरान खान यांना भेटू दिलं जात नाहीये. इमरान खान यांची जेलमध्ये हत्या करण्यात आली, अशी बातमी काही प्रसारमाध्यमांनी चालवली, माहीत नाही त्यांना अशी माहिती कुठून मिळाली? असं इमरान खान यांची बहीण अलीमा खान यांनी म्हटलं आहे, त्यांनी पुढे बोलताना पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप केला आहे की, पोलिसांना थेट आदेश देण्यात आले आहेत की, इमरान खान यांना ज्या जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे, त्या जेल परिसरात जर पीटीआयचे कार्यकर्ते जमले किंवा इमरान खान यांचे समर्थक जमले तर त्यांच्यावर लाठीचार्ज करा अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असा आरोपही यावेळी इमरान खान यांच्या बहिनेने केला आहे.

त्यामुळे पोलीस तिथे जे लोक जमतील त्यांच्यावर थेट हल्ला करत आहेत, त्यांना मारहाण करत आहेत. ते लहान मुलं महिला, वृद्ध व्यक्ती असं काहीच पहात नाहीत, सरकारचा असा प्लॅन आहे की, इमरान यांना देश सोडून जाण्यासाठी मजबूर करायचं. मात्र इमरान देश सोडणार नाहीत, कारण त्यांना देशभरातून प्रचंड समर्थन मिळत आहे. पाकिस्तानमध्ये जेव्हा मोठं आंदोलन झालं होतं, तेव्हा सरकारने अनेक आंदोलकांना गोळ्या घातल्या होत्या. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. ही संख्या एवढी होती की मोजता देखील येणार नाही. त्यांनी मृतदेह लपवले, जखमी लोकांना देखील लपवलं.आता हे आंदोलन पाकिस्तान सरकारच्या कंट्रोलमध्ये राहिलेलं नाही. त्यांना वाटतं की इमरान खान यांनी माफी मागवी आणि पाकिस्तान सोडावा, पण इमरान खान पाकिस्तान सोडणार नाही, कारण ज्यांनी मागे पाकिस्तान सोडला ते सर्व प्रशासक होते, मात्र इमरान खान हे लीडर आहेत, असं यावेळी अलीमा खान यांनी म्हटलं आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ