अमेरिकेची परिस्थिती बिकट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत, 40 दिवसांहून…

डोनाल्ड ट्रम्प सध्या जगात चर्चेत असलेले व्यक्ती आहेत. डोनाल्ड ट्रम्प अनेक देशांना टॅरिफच्या धमक्या देताना दिसत आहेत. त्यांच्या अटी मान्य करा अथवा आम्ही टॅरिफ लावणार अशी भूमिका सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची बघायला मिळतंय.

अमेरिकेची परिस्थिती बिकट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत, 40 दिवसांहून...
Donald Trump
| Updated on: Nov 10, 2025 | 8:44 AM

अमेरिका मागील काही दिवसांपासून टॅरिफच्या मुद्द्यावरून जगाला वेठीस धरतंय. भारतासह काही देशांवर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला आहे. मात्र, दुसऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्का लावण्याच्या तयारी असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वत:च्या देशामध्ये तीनतेरा वाजल्याचे बघायला मिळतंय. अमेरिकेत सुरू असलेले सरकारी बंद 40 दिवसांहून अधिक काळ सुरू आहे, परंतु आता ते लवकरच संपेल अशी अपेक्षा आहे. या संपामुळे मोठा धोका निर्माण झाला असून याचे परिणाम थेट बघायला मिळत आहेत. सिनेट मतदानामुळे हा प्रश्न सुटू शकतो. शटडाऊन संपवण्यासाठी डेमोक्रॅटिक सदस्यांसोबत करार होत आहे, परंतु अद्याप काहीही अंतिम झालेले नाही, असे रिपब्लिकन नेता सिनेटर जॉन थ्यू यांनी म्हटले.

रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रस्तावावर विचार करण्यास नकार दिला होता. पण आता असे संकेत आहेत की, रिपब्लिकन आर्थिक पॅकेजवर काम करत आहेत, त्यामुळे लवकरच हा बंद संपण्याचे मोठे संकेत आहेत. ज्यामुळे वेटरन्स, फूड एड पूर्ण वर्षाचा निधी मिळेल आणि सरकारी शटडाऊन संपण्यास मदत होईल. अमेरिकेत जेव्हा काँग्रेस निर्धारित वेळेत निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी ठरते तेव्हा सरकारी बंद पडते.

सरकारी शटडाऊन संपवण्यासाठी खर्च विधेयक किंवा सतत ठराव  काँग्रेसने मंजूर करणे आणि राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. सरकारकडून त्यासाठी आता प्रयत्न केली जात आहेत. 218  सदस्यांचा कोरम उपस्थित आहे असे गृहीत धरून 435 सदस्यांपैकी 218 मते गृहीत धरली. या सरकारी संपाचा वाईट परिणाम अमेरिकेत होताना दिसत आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना हा संप संपण्यात अधिक रस दिसत नाहीये.

सिनेट मतदानापूर्वी डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकनने हा संप संपवण्याचा स्पष्टपणे संकेत दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतूनही जोरदार विरोध होताना दिसतोय. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा संप मोठे आव्हान होते. शेवटी आता तब्बल 40 दिवसांनंतर या संपातून मार्ग निघण्याचे मोठे संकेत आहेत.