AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुतिन-ट्रम्प यांची बैठक भारतासाठी धोकादायक? आता नवं टेन्शन वाढण्याची शक्यता!

अलास्का येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि ट्रम्प यांच्यात एक महत्त्वाची बैठक पर पडली. या बैठकीत मात्र युद्धबंदीचा कोणताही करार झाला नाही. दरम्यान, आता लवकरच पुतिन, ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांची एकत्र बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता या बैठकीनंतर सप्टेंबर महिन्यात भारताचं टेन्शन वाढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुतिन-ट्रम्प यांची बैठक भारतासाठी धोकादायक? आता नवं टेन्शन वाढण्याची शक्यता!
donald trump and vladimir putin
| Updated on: Aug 19, 2025 | 6:30 PM
Share

Donald Trump And Vladimir Putin Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नुकतेच अलास्का येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि ट्रम्प यांच्यात एक महत्त्वाची बैठक पर पडली. या बैठकीत मात्र युद्धबंदीचा कोणताही करार झाला नाही. दरम्यान, आता लवकरच पुतिन, ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांची एकत्र बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता या बैठकीनंतर सप्टेंबर महिन्यात भारताचं टेन्शन वाढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुतिन-ट्रम्प-झेलेन्स्की यांच्या बैठकीत काय होऊ शकतं?

मिळालेल्या माहितीनुसार पुतिन, ट्रम्प आणि झेलेन्स्की हे तिन्ही नेते बैठकीसाठी एकाच मंचावर आल्यानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चेअंतर्गत युक्रेनमधील लुहान्स्क, डोनेत्स्क हे भाग रशियाला सोपवण्यावर एकमत होऊ शकतं. तसेच युक्रेन क्रिमियावरील आपला दावा सोडू शकतो. विशेष म्हणजे युक्रेन नाटो देशांचा सदस्य होण्याची मागणीही मागे घेण्यावर या बैठकीत एकमत होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केली जात आहे. युक्रेनने या सर्व अटी मान्य केल्यास युक्रेनला सुरक्षेची हमी दिली जाऊ शकते.

…तर अमेरिका-रशिया यांच्यातील संबंध सुधारणार

लवकरच होणाऱ्या या बैठकीत वरील मुद्द्यांवर एकमत झाल्यास एका प्रकारे अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आले आहेत, असे म्हटले जाऊ शकते. युक्रेनने या अटी मान्य केल्यास रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास या दोन्ही देशांत गेल्या कित्येक दशकांपासून चालू असलेले शीतयुद्ध संपुष्टात येऊ शकते. एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले अमेरिका आणि रशिया या दोन्ही देश एकमेकांच्या हातात हात टाकून मार्गक्रमण करू शकतात.

भारताला पाऊल जपून टाकावे लागणार

ही गृहितके सत्यात उतरली तर भारताला आपले पाऊल जपून टाकावे लागेल. अमेरिकेवर दाबव कायम राहावा यासाठी भारताने नेहमीच रशियाशी आपले संबंध चांगले कसे राहतील याची काळजी घेतलेली आहे. अमेरिकेसोबत चांगले संबंध नसल्यामुळे अगोदर पाकिस्तानच्या मुद्द्यावर भारताला रशियाचा पाठिंबा मिळायचा. मात्र अमेरिका आणि रशिया यांच्या संबंधांत सुधारणा झाल्यास रशिया पाकिस्तानविरोधात भारताची साथ देईल का? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळेच भारताला यापुढे जपून पाऊल टाकावे लागेल. ट्रम्प-पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील बैठक ही यशस्वी ठरल्यास भारताचे टेन्शन एकाप्रकारे वाढू शकते. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?