जिंकून दाखवलं! रस्त्यावर उतरून किस, दारु पार्टी, फटाके फोडले; सहा महिन्यांचा लॉकडाऊन संपताच ‘या’ देशात जल्लोष

| Updated on: May 14, 2021 | 6:07 PM

भारतासह संपूर्ण जग कोरोनाशी जीवनमरणाची लढाई लढत असतानाच संपूर्ण जगाला आशेचा किरण दाखवणारी महत्त्वाची घटना घडली आहे. (Spain celebrates end of COVID lockdown with massive street parties)

जिंकून दाखवलं! रस्त्यावर उतरून किस, दारु पार्टी, फटाके फोडले; सहा महिन्यांचा लॉकडाऊन संपताच या देशात जल्लोष
Spain
Follow us on

मॅड्रिड: भारतासह संपूर्ण जग कोरोनाशी जीवनमरणाची लढाई लढत असतानाच संपूर्ण जगाला आशेचा किरण दाखवणारी महत्त्वाची घटना घडली आहे. स्पेनने अखेर कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. संपूर्ण देश कोरोना मुक्त झालं आहे. संपूर्ण देशात कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन अखेर सहा महिन्यात उठवण्यात आला आहे. त्यामुळे स्पेनच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून एकमेकां अलिंगन देत, किस करत, दारुचे पेगवर पिग रिचवत आणि फटाके फोडून संगीताच्या तालावर ठेका धरत जल्लोष साजरा केला आहे. (Spain celebrates end of COVID lockdown with massive street parties)

स्पेनमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून रात्रीचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, संपूर्ण देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा होताच लोकांनी रस्त्यावर उतरून एकच जल्लोष केला. स्वातंत्र्याच्या घोषणा देत स्पेनच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून पेगवर पेग रिचवले. स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे मनाई असतानाही नागरिकांनी दारुचा आनंद लुटला. त्यामुळे काही ठिकाणी पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाली. तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना अलिंगन देत किस केला. काहींनी तर संगीताच्या तालावर ठेका धरला. तर काहींनी पटाखे फोडून जोरदार घोषणाबाजी केली. अगदी अबाल-वृद्धही या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात सहभागी झाले होते.

सोशल डिस्टन्सिंचा फज्जा

स्पेनच्या बार्सिलोना आणि मॅड्रिड या दोन शहरात सर्वाधिक जल्लोष करण्यात आला. तोंडाला मास्क न लावताच लोक घराबाहेर पडले होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचंही कुणीच पालन केलं नसल्याने तज्ज्ञांनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारचं वागणं महागात पडू शकतो. कोरोनाला सहज घेऊ नका. कारण ही महामारी अद्यापही संपलेली नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

तर संसर्ग पसरू शकतो

दरम्यान, स्पेनमध्ये अजून अनेक कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यामुळे संसर्ग पसरू शकतो. अधिक संपर्कात असलेले लोक अधिक संक्रमणाचं कारण ठरू शकतात, असं स्पेनच्या महामारी विज्ञान सोसायटीच्या अध्यक्षा एलेना वेनेसा मार्टिनेज यांनी सांगितलं. देशभरात रात्रीच्या संचारबंदीसहीत रविवारी मध्यरात्रीपासून जास्तीत जास्त निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी प्रतिबंध लागू आहेत. अजूनही सावध राहायला हवं, असंही त्यांनी सांगितलं. (Spain celebrates end of COVID lockdown with massive street parties)

 

संबंधित बातम्या:

स्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती?; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर

 कोरोना होऊन गेलाय त्यांनी लस कधी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचं मत काय?

कोरोना रुग्णांना ‘हा’ ही आहे मोठा धोका, तरुणांच्या वाढत्या मृत्युचे कारणही त्यातच दडलंय…

(Spain celebrates end of COVID lockdown with massive street parties)