स्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती?; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर

रशियातून आलेल्या स्पुतनिक (Sputnik V) या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. भारतात ही लस 995 रुपयात मिळणार आहे. (Dr Reddy’s announces soft launch of Sputnik V in India)

स्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती?; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर
Sputnik-V

नवी दिल्ली: रशियातून आलेल्या स्पुतनिक (Sputnik V) या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. या लसची किंमत 948 रुपये असेल. मात्र त्यावर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे लसीची किंमत 948 + 5 टक्के जीएसटी म्हणजे या लसीसाठी एकूण 995 रुपये मोजावे लागणार आहेत. भारतात स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली आहे. या डोसला सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीजकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. (Dr Reddy’s announces soft launch of Sputnik V in India)

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने स्टॉक एक्सचेंजला स्पुतनिकच्या डोसच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे. या लसीचेही दोन डोस घेणं बंधनकारक आहे. या कंपनीने या लसीच्या एका डोससाठी 948 रुपये ठेवली आहे. त्यावर 5 टक्के जीएसटी लागणार असल्याने एका डोसला हजार रुपये पडणार आहेत.

हैदराबादमधील व्यक्तिला पहिला डोस

रेड्डीज लॅबने या व्हॅक्सिनची सॉफ्ट लॉन्चिंग करताना शुक्रवारी हैदराबादमधील एका व्यक्तीला या लसीचा पहिला डोस दिला. या लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली होती. तसेच या लसीला 13 मे रोजी सेंट्रल ड्रग्स रेग्युलेटरीने मंजुरी दिली आहे. या लसीची आणखी एक खेप आयात केली जाणार असून त्यानंतर या लसीची जूनपासून भारतातच निर्मिती केली जाणार आहे.

 

किंमत कमी होणार

भारतात या लसीची निर्मिती झाल्यास त्याची किंमत कमी होईल. भारतात सहा लसी तयार करणाऱ्या कंपन्यांशी या लसीच्या उत्पादनाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, निती आयोगाच्या एका सदस्याने डिसेंबरपर्यंत देशात कोविड व्हॅक्सिनेच 200 कोटीहून अधिक डोस भारताला उपलब्ध होतील असा दावा कलेा आहे.

 

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज

LIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा

अख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं!

(Dr Reddy’s announces soft launch of Sputnik V in India)