AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जंगलात वणवा भडकला, शेकडो झाडे जळून खाक; आजूबाजूच्या गावातील 12 जणांचा मृत्यू

spain fire : स्पेनच्या जंगलात वणवा पेटला आहे. या वणव्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

जंगलात वणवा भडकला, शेकडो झाडे जळून खाक; आजूबाजूच्या गावातील 12 जणांचा मृत्यू
| Updated on: Jul 10, 2026 | 2:07 PM
Share

दक्षिण युरोपच्या तीव्र उष्णतेच्या लाटेत स्पेनच्या अल्मेरिया जंगलात वणवा भडकला आहे. वणवा भडकल्यानंतर या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. तर आतापर्यंत घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण भागातील अल्मेरियाच्या लॉस गैलार्डोसमधील जंगलाला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच 150 हून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आपत्कालनी मंत्री एंटानियो सैन्ज यांनी ही आग विनाशकारी असल्याचे म्हटलं आहे.

आग कशी लागली?

लॉस गैलार्डोस स्पेनच्या आंदालूसियामध्ये अल्मेरिया प्रांताची एक नगरपालिका आहे. या प्रांतातील एका गावात असलेल्या जंगलाला (Forest) भीषण आग लागली. सध्या या भागात तापमान 40 डिग्री सेल्सिअसहून अधिक आहे. वीजेची तार तुटल्याने आग लागल्याचा संशय आहे. त्यात जंगलात उन्हाने वाळलेली पाने अधिक असल्याने आग सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. याआधी दक्षिण फ्रान्समध्ये आठवड्याच्या सुरुवातीला एका जंगलाची सर्वत्र पसरली होती.

जंगलाजवळ 24 हून अधिक गावे 

या भीषण आगीत (Fire) 12 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही जणांचे मृतदेह हे वाहनात आढळले आहेत. स्पेनच्या सीमेवर 24 हून अधिक गावे आहेत. या सर्व गावांत जवळपास 10000 हून अधिक जण राहतात. या आगीच्या घटनेनंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. आगीमुळे अनेक मार्ग देखील बंद झाले आहे. आगीच्या धुरामुळे लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. त्यामुळे बहुतांश जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

स्पेनमध्ये भीषण उष्णतेची लाट 

स्पेनमध्ये ही 1950 सालानंतरची सर्वात भीषण उष्णतेची लाट मानली जात आहे. या तापमानाने उच्चांक गाठला आहे. काही भागांमध्ये 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या उष्णतेमुळे जमिनीचा मोठा भाग कोरडा पडल्याचेही माहिती मिळतेय. गेल्या वर्षी स्पेनमध्ये 9 लाख 71 हजार एकर जमीनीवरील (Land) झाडे जळून खाक झाले होते. या वर्षी लागलेल्या आगीने ग्रामस्थांचं टेन्शन वाढलं आहे. अनेक जण सरकार आणि प्रशासनाकडे मदतीची याचना करत आहेत.

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?