आणखी एक देश पेटला, जे भारतात घडलं तेच…सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे तरुणांनी…तब्बल 57 जणांचा मृत्यू!
स्पेनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा तेथील लोकांनी चुकीचा अर्थ घेतला आहे. याच कारणामुळे स्पेनमधीलसेऊटा या शहरात हाहा:कार उडाला आहे. या शहरात मोठे मानवी संकट निर्माण झाले आहे.

Spain Supreme Court : भारतात झालेल्या जेन झींच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला एका प्रकारे तरुणांची ताकदच दिसली. बांगलादेश, श्रीलंका यासारख्या देशांतही तरुणांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे सत्तापालट झाले. म्हणूनच आता जगभरात ये जेन झी तरुणांची चर्चा सुरू आहे. भारताच्या सरन्यायाधीशांनी तरणांविषयी बोलताना झुरळ असा उल्लेख केल्यामुळेच हे आंदोलन पेटले. दरम्यान, आता याच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे भारतासारख्याच्य एका देशात मोठा गजहब उडाला आहे. एका निर्णयामुळे तब्बल 57 लोकांचा मृत्यू झाला असून संबंधित देशाच्या एका शहरात लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
नेमकं काय घडलं?
स्पेनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा तेथील लोकांनी चुकीचा अर्थ घेतला आहे. याच कारणामुळे स्पेनमधीलसेऊटा या शहरात हाहा:कार उडाला आहे. या शहरात मोठे मानवी संकट निर्माण झाले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथे एक अफवा पसरवण्यात आली. याच अफवेमुळे तब्बल 60000 प्रवासी सेऊटा या शहरात अचानक घुसले. परिणामी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्याने त्या शहरात खाण्याचा, राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथे अन्नाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या शहरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात, समुद्री मार्गाने शहरात घुसताना तब्बल 57 लोकांचा मृत्यू झाला आहे.
न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला?
स्पेनमधील सेउटा या शहरात जी धांदल उडाली त्यामागे सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय होता. 8 जुलै रोजी न्यायालयाने स्थलांतरितांबाबत एक निर्णय दिला होता. जे लोक समुद्रमार्गे येत आहेत. त्यांना तत्काळ त्यांच्या मूळ देशात पाठवता येत नाही, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते. कोर्टाच्या याच निकालाचा वेगळा अर्थ काढण्यात आला. जे लोक समुद्रमार्गे स्पेनमध्ये जातील त्यांना कोणीही परत पाठवू शकत नाही. त्यांना स्पेनमध्येच राहण्याची परवानगी दिली जाईल, असा समज लोकांचा झाला. याच गैरसमजातून हजारो लोकांनी रातोरात स्पेनमधील सेउटा हे शहर गाठले. समुद्रमार्गाने सेउटा शहरात जाणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी झाली. यातच 57 लोकांचा मृत्यू झाला.