Starbucks Boycott : स्टारबक्स संकटात, अमेरिकेत मोठं वादळ, बहिष्कार घालण्याची मागणी, थेट रस्त्यावर…

प्रसिद्ध कॉफी ब्रँड स्टारबक्सवर बहिष्काराबद्दलची धक्कादायक माहिती पुढे येतंय. करार नाही कॉफी नाही, अशी भाषा वापरली जात आहे. हेच नाही तर हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरल्याचेही बघायला मिळत आहे.

Starbucks Boycott : स्टारबक्स संकटात, अमेरिकेत मोठं वादळ, बहिष्कार घालण्याची मागणी, थेट रस्त्यावर...
Starbucks Boycott
| Updated on: Nov 16, 2025 | 1:35 PM

गेल्या काही दिवसांपासून भारत अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. त्यामध्येच प्रसिद्ध कॉफी ब्रँड स्टारबक्सवर बहिष्काराबद्दलची धक्कादायक माहिती पुढे येतंय. हेच नाही तर थेट स्टारबक्सवर बहिष्कार टाकण्यची भाषा करण्यात आली. न्यू यॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी शुक्रवारी स्टारबक्सवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आणि संप करणाऱ्या युनियन बॅरिस्टांना पाठिंबा दिला. जोहरान ममदानीने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, स्टारबक्स कामगार देशभरात संपावर आहेत, ते योग्य करारासाठी लढत आहेत. जोपर्यंत त्यांचा संप होणार नाही, तोपर्यंत मी स्टारबक्समधून अजिबातच खरेदी करणार नाहीये. सर्वांनी साथ द्या, जोपर्यंत करार नाही, तोपर्यंत कॉफी नाही.

हा संप स्टारबक्सच्या वार्षिक रेड कप डेच्या बरोबरीने झाला. मोफत पुनर्वापर करता येणारे हॉलिडे कप घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असताना अमेरिकेतील 25 हून अधिक शहरांमधील कामगार संपावर आहेत. युनियनने म्हटले आहे की, हा स्टारबक्सच्या इतिहासातील सर्वात मोठा संप ठरू शकतो. युनियनने लोकांना आवाहन केले की, कोणताही करार नाही, कॉफी नाही. संपादरम्यान कॉफी किंवा स्टारबक्सचे कोणतेही उत्पादन खरेदी करू नका.

स्टारबक्स कंपनीविरुद्ध राष्ट्रीय कामगार संबंध मंडळाकडे 1 हजाराहून अधिक अन्याय्य कामगार पद्धतीच्या तक्रारी दाखल असूनही चर्चा सुरू आहे. आता हा संप अधिक तीव्र होताना दिसतोय. कंपनी म्हणते की, युनियनच्या मागण्या अवास्तव आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांना सरासरी $19 प्रति तास आणि $30 पेक्षा जास्त प्रति तास वेतन दिले जाते. स्टारबक्सने काही महिन्यांत अमेरिकेत शेकडो स्टोअर्स बंद केले आहेत.

ज्यात 59  युनियनाइज्ड स्टोअर्सचा समावेश आहे. बंद पडलेल्या अनेक स्टोअर्सना काही दिवसांचीच सूचना मिळाली होती. त्यामध्येच कर्मचाऱ्यांच्या मागण्या सातत्याने वाढताना दिसत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांचा संप अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत. भारतात देखील मोठ्या संख्येने स्टारबक्सचे स्टोअर्स आहे. स्टारबक्स कॉफीसाठी अत्यंत फेमस आहे. विशेष म्हणजे तरूणाईमध्ये स्टारबक्सच्या कॉफीबद्दल खास क्रेझ बघायला मिळते.