Explainer : होर्मुझ रुटमुळे जगाची पंचाईत का झाली? असं काय आहे त्या मार्गावर? वाचा A टू Z स्टोरी!

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे जलवाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. आयआरजीसीच्या (IRGC) कडक देखरेखीमुळे नाकेबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर तसेच भारतासह अनेक देशांच्या ऊर्जा सुरक्षेवर होत आहे.

Explainer : होर्मुझ रुटमुळे जगाची पंचाईत का झाली? असं काय आहे त्या मार्गावर? वाचा A टू Z स्टोरी!
Strait of hormuz
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 26, 2026 | 7:53 PM

सध्या मिडल इस्टमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी मिळून इराणवर हल्ला केला. त्यानंतर इराणने देखील या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता जवळपास महिना होत आला असला तरी युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. इराणने आखाती देशांमधील अमेरिकेची लष्करी तळे उद्ध्वस्त केली. तसेच अमेरिका आणि इस्त्रायलच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष केले. त्यानंतर जगभरातील अनेक देशांना व्यवसायाच्या दृष्टीने जोडणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. या सामुद्रधुनीमधून प्रवास करणाऱ्या जहाजांवर थेट हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जगात मोठे संकट आले. आता होर्मुझ रुटमुळे जगाची पंचाईत का झाली? असं काय आहे त्या मार्गावर? याबाबत चला जाणून घेऊया… हॉर्मुज सामुद्रधुनीमधील वाढता तणावाने संपूर्ण जगात चिंता निर्माण केली आहे. इराणने अमेरिका आणि इस्त्रायलशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या महत्त्वाच्या समुद्री मार्गावर बंदी लागू केली आहे. या निर्णयाचा परिणाम जागतिक बाजारपेठांवर स्पष्ट दिसून येत आहे, कारण हा मार्ग तेल आणि...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us