AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iranian Oil : इराणी तेल विकत घेतल्याच्या बातम्यांवर रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलं स्पष्टीकरण, नेमकं सत्य काय ते सांगितलं

Iranian Oil : अमेरिकेने निर्बंध हटवल्यानंतर भारतीय कंपन्यांनी समुद्रात उपलब्ध असलेलं इराणी तेल विकत घेतल्याच्या बातम्या आल्या. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं नाव आलं. आता रिलायन्सने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं सत्य काय ते सांगितलं आहे.

Iranian Oil : इराणी तेल विकत घेतल्याच्या बातम्यांवर रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलं स्पष्टीकरण, नेमकं सत्य काय ते सांगितलं
reliance industrys limited
| Updated on: Mar 26, 2026 | 8:22 PM
Share

मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मागच्या आठवड्यात इराणच्या तेलावरील निर्बंध उठवले. समुद्रात तेल टँकरवर उपब्लध असलेलं इराणी तेल विकत घेण्याची परवानगी दिली. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील जल वाहतूक मर्यादीत केल्यामुळे जगात तेल संकट निर्माण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त तेल बाजारात उपलब्ध व्हावं, जेणेकरुन तेलाच्या किंमती कमी होतील आणि तेल संकटाचा सामना करणाऱ्या देशांना दिलासा मिळेल यासाठी अमेरिकेने एका ठराविक काळासाठी तेलावरील निर्बंध हटवले आहेत. ही बातमी आल्यानंतर भारतीय तेल रिफायनरीजनी समुद्रातील टँकरवरील इराणी तेल विकत घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता रिलायन्स इंडस्ट्रीजने स्पष्टीकरण दिलं आहे.

इराणकडून तेल विकत घेतल्याची बातमी चुकीची आहे, असं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गुरुवारी सांगितलं. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने इराणकडून तेल विकत घेतल्याच्या मिडिया रिपोर्ट्सवर स्पष्टीकरण दिलं. कंपनीने या बातम्या फेटाळून लावल्या. अलीकडे या संबंधी मीडियामध्ये आलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितलं. कंपनीने इराणकडून तेल विकत घेतलं हे वृत्त तथ्यहीन असून लोकांना चुकीची माहिती देणारं आहे. बातमी प्रकाशित करण्याआधी तथ्य तपासून घ्यावीत असं आम्ही मीडियाला आवाहन करतो असं रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटलं आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने काय म्हटलं?

कंपनीने नॅशनल इराणीयन ऑइल कंपनीकडून 50 लाख बॅरल कच्च् तेल विकत घेतलं आहे असं रॉयटर्सने वृत्त दिलं होतं. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने हे स्पष्टीकरण दिलं आहे. रिपोर्टनुसार हे तेल ब्रेंट फ्यूचर्स पेक्षा जास्त किंमतीला विकत घेतलं. अमेरिकेकडून निर्बंधातून काही काळासाठी सवलत मिळाली आहे. त्यामुळे समु्द्रात उपलब्ध असलेल्या इराणी तेल खरेदीचा व्यवहार करता येऊ शकतो असं म्हटलं होतं. 20 मार्च पर्यंत समुद्रात लोड केलेल्या शिपमेंट्सवर ही सवलत होती. 19 एप्रिलपर्यंत या व्यवहाराला परवानगी आहे. रिलायन्सने अशी कुठलीही डील केलेली नाही. त्यांनी अशा प्रकारची वृत्त फेटाळून लावली आहेत.

हे युद्ध लवकरात लवकर संपलं पाहिजे

हे युद्ध लवकरात लवकर संपुष्टात यावं अशी जगाची इच्छा आहे. अन्यथा अभूतपूर्व फक्त तेल संकटच निर्माण होणार नाही, तर महागाई सुद्धा वाढेल. काही देशांच्या अर्थव्यवस्था कोसळू शकतात. सध्या या युद्धाचे भयावह परिणाम दिसू लागले आहेत.

Follow Us
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत