AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तुमची मुलं वारंवार आजारी पडतात? मग करा हा सोपा उपाय

अनेकांसोबत असं होतं की त्या घरात असलेली मुलं वारंवार आजारी पडतात. यामागे घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा देखील असू शकते. यावर वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : तुमची मुलं वारंवार आजारी पडतात? मग करा हा सोपा उपाय
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 26, 2026 | 8:50 PM
Share

अनेकांसोबत असं घडतं की घरात असलेली लहान मुलं ही वारंवार आजारी पडतात. यामध्ये अनेक कारणं असू शकतात, जसं की वातावरणामध्ये अचानक होणारे बदल, दुषीत हवा असं काहीही कारण असू शकतं. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते, त्यामुळे ते वारंवार आजारी पडतात. मुलं जर वारंवार आजारी पडत असतील तर त्यासंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. मात्र वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा देखील तुमच्या घरात अशा गोष्टी घडू शकतात. नकारात्मक ऊर्जेचा परिणाम हा तुमच्या मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो. ते आजारी पडू शकतात. अशा प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

खेळणी – वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेले आहे की, जर तुमच्या घरात बंद पडलेलं घड्याळ असेल किंवा खराब झालेल्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे अशा वस्तू घरातून हटवल्या पाहिजेत. या गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते, जिचा परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. त्याचप्रमाणे मुलांना तुम्ही जी खेळणी घेऊन दिली आहेत, त्यामध्ये जर तुटलेली खेळणी असतील तर त्याचा देखील तुमच्या मुलाच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशा तुटलेल्या खेळण्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्याचा परिणाम हा मुलांच्या आरोग्यावर होतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अशी तुटलेली खेळणी घरात न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुलाच्या बेडरूमची खिडकी – वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या बेडरूमची खिडकी ही नेहमी पूर्व दिशेलाच हवी. त्याचं वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अशी दोन्ही कारणं आहेत. वैज्ञानिक कारण म्हणजे मुलांना लहानपणी मोठ्या प्रमाणात डी जीवनसत्त्वाची गरज असते. जर मुलाच्या बेडरूमची खिडकी ही पूर्व दिशेला असेल तर सूर्याची किरणं बेडरूममध्ये पडतात, त्यातून मुलांना डी जीवनसत्त्व मिळतं. तसेच जर मुलाच्या बेडरूमची खिडकी ही पूर्व दिशेला असेल तर बेडरूममध्ये पुरेसा प्रकाश देखील राहतो, ज्याचा सकारात्मक परिणाम हा तुमच्या मुलाच्या प्रगतीवर होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?