AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयंकर स्फोटाने सीरियात खळबळ, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रो थोडक्यात बचावले; 6 जणांचा मृत्यू

Syria Blast : सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये एका हॉटेलबाहेर सलग दोन भीषण स्फोट झाले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो मुक्कामी असलेल्या भागात ही घटना घडली आहे.

भयंकर स्फोटाने सीरियात खळबळ, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रो थोडक्यात बचावले; 6 जणांचा मृत्यू
Damascus Hotel BlastImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 07, 2026 | 2:54 PM
Share

सीरियातून मोठी बातमी समोर आली आहे. राजधानी दमास्कसमध्ये एका हॉटेलबाहेर सलग दोन भीषण स्फोट झाले आहे. या हॉटेलमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो मुक्कामी होते अशी माहतीही समोर आली आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अल शरा यांच्या निमंत्रणावरून मॅक्रो दमास्कस दौऱ्यावर आले असताना हा स्फोट झाला आहे. या बॉम्बस्फटात 6 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सीरियाच्या पर्यटन मंत्र्यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मॅक्रो यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांचा मृत्यू

अल अरेबियाच्या वृत्तानुसार, मॅक्रो हॉटेलमधून बाहेर पडून अल शरा यांची भेट घेण्यासाठी जात असतानाच हॉटेलबाहेर जोरदार स्फोटाचा आवाज झाला. रॉयटर्सच्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तेथे मोठ्या संख्येने लोक होते. या स्फोटातील मृतांमध्ये मॅक्रो यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अनेक पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळे या भागात मोठी खळबळ उडाली.

इमॅन्युएल मॅक्रो थोडक्यात बचावले

मॅक्रो यांच्या हॉटेलबाहेर झालेला स्फोट कार बॉम्बद्वारे घडवून आणल्याचे समोर आले आहे. लाल रंगाची कार प्रथम हॉटेलबाहेर उभी करण्यात आली आणि त्यानंतर त्यात स्फोट घडवून आणण्यात आला. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, स्फोटानंतर मॅक्रो यांनी नियोजितप्रमाणे अल शरा यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांकडून स्फोटाच्या घटनेच्या तपासाला सुरुवात

या घटनेनंतर सीरियन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे. अल शरा यांच्या सरकारच्या काळात सीरियाला भेट देणारे मॅक्रो हे युरोपियन संघातील पहिले नेते आहेत. ते दोन दिवसांच्या दौऱ्यावर दमास्कसमध्ये आले होते आणि हा त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, हे दोन्ही स्फोट दमास्कसमधील अतिशय उच्चभ्रू भागात झाले. सलग दोन स्फोटांचे आवाज संपूर्ण परिसरात ऐकू आले. त्यामुळे बराच वेळ या भागात खळबळ उडाली आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु