डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा, भारताचा या देशासोबत मोठा करार, अमेरिकेमध्ये…

टॅरिफवरून भारत आणि अमेरिकेत संबंध ताणलेले असतानाच भारताकडून आता मोठा धक्का हा अमेरिकेला देण्यात आलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यानंतर काही देश भारताच्या बाजूने ठामपणे उभी आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा, भारताचा या देशासोबत मोठा करार, अमेरिकेमध्ये...
| Updated on: Aug 23, 2025 | 11:49 AM

अमेरिकेकडून भारतावर मोठा टॅरिफ लावण्यात आला आहे, शिवाय भारताबद्दल धक्कादायक विधाने अमेरिकेकडून केली जात आहेत. त्यामध्येच आता भारताने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. भारतावर लादण्यात आलेल्या टॅरिफनंतर भारताने अमेरिकेच्या विरोधात आपला मोर्चा वळवला असून त्यांच्यापुढे न झुकता पर्यायी मार्ग शोधली आहेत. आता टॅरिफच्या धमक्यांनंतर भारताने जेंट इंजनवरून मोठा झटका दिला आहे. भारत आता फ्रान्ससोबत मिळून स्वदेशी स्टील्थ जेट इंजन बनवत आहे, तशी तयारी सुरू करण्यात आलीये.

सरकारने आता याबद्दल पाऊले उचलली आहेत. एका रिपोर्टनुसार, फ्रान्स कंपनीसोबतच्या करारानंतर भारत हा 120 किलोन्यूटन थ्रस्ट इंजन तयार करणार. डीआरडीओने देखील याला मंजूरी दिली आहे. राजनाथ सिंह यांनी देखील मंजूरी दिली आहे. भारताने फायटर जेटचे इंजन बनवल्याने एक वेगळी दिशा मिळेल, असे सांगितले जात आहे. वायुसेनेने विमानांबद्दल एक पत्र देखील लिहिले आहे. भारताने फ्रान्ससोबत हा करार केल्यानंतर अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.

हेच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील जपानच्या दाैऱ्यावर पुढील आठवड्यात जाणार आहेत. तिथे ते मोठे काही करार करणार आहेत. जपान भारतीय बाजारपेठेत मोठी गुंतवणूक करणार आहे. शिवाय भारताने रशियासोबत काही मोठे करार कच्चा तेलाचे केले आहेत. चीननेही भारतावरील दुर्मिळ खनियांचे निर्बंध उठवले आहेत आणि काही महत्वाचे करार केले आहेत.  भारतावर अमेरिकेने तब्बल 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अनेक देश हे भारताच्या मदतीला धावून आली आहेत.

चीन आणि भारतामधील जवळीकता वाढली आहे. रशियाकडून भारत कच्चे तेल खरेदी करत असल्याने आपण भारतावर टॅरिफ लावल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. हेच नाही तर युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाला भारतच कारणीभूत असल्याचे अमेरिकेने म्हटले. भारत रशियाचे तेल खरेदी करून त्यांना मोठा पैसा देत असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेकडून भारतावर टॅरिफसाठी दबाव टाकला जात असतानाच भारत हा अमेरिकेच्या समोर झुकला नाहीये.