सर्वात मोठी बातमी! अमेरिकाचा ब्रॅंड टॉयलेटमध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, भारतासोबत..
डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून टिकेचे धनी ठरताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. यासोबतच धक्कादायक विधाने डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल करत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा आहेर मिळाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या मुद्द्यावरून भारताला धमकावण्याचे काम केले. मात्र, भारताने शेवटपर्यंत अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. भारतावर टॅरिफ लावणे चुकीचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. शिवाय वारंवार भारताला डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांकडून धमक्या दिल्या जात आहेत. रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. भारत, चीन आणि रशिया एकत्र आल्याने अमेरिकेचा जळफळाट उठलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दादागिरीमुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा फोन उचलणे देखील बंद केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी चार फोन केलयानंतरही नरेंद्र मोदी यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा घरचा आहेर मिळाल्याचे बघायला मिभळतंय. वॉशिंग्टनचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन याने भारताविरोधात ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प प्रशासन आक्रमक भूमिका घेत आहे, त्यावर टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या नितीनुसार भारताला चीनकडे ढकलत आहेत. जे अमेरिकेच्या हिताचे अजिबातच नाहीये. बायडेन यांच्यावेळी सुलिवन हे सुरक्षा सल्लागार होते. यावेळी त्यांनी इतर देशांचा अमेरिकेबद्दलचा वाढता अविश्वास यावर भाष्य केले आहे.
सुलिवन यांनी म्हटले की, आज आपल्याला सहयोगी देश हे व्यत्यय आणणारा देश म्हणून बघत आहेत. मुळात म्हणजे अमेरिकेच्या टॅरिफच्या मुद्दामुळे चीनची लोकप्रियता आणि नीती अमेरिकेपेक्षा कितीतरी पुढे गेली आहे. जेव्हा मी तिकडे जातो आणि तिथल्या नेत्यांशी चर्चा करतो त्यावेळी ते अमेरिकेचा धोका कमी करण्याबद्दल भाष्य करतात. सध्या अमेरिकेला फक्त व्यत्यय आणणारा देश म्हणून बघितले जात आहे आणि त्याच्यावर कोणाही विश्वास करू इच्छित नाहीये.
आज चीन हा वैचारिकस्तरावर लोकप्रियतेवर गेला तर आपण अमेरिका ब्रॅंड टॉयलेटमध्ये दिसत आहे. भारताचे उदाहरण देत त्यांनी म्हटले की, एक उदाहरण म्हणून भारताचेच घ्या ना…भारत हा एक असा देश आहे, ज्याच्यासोबत मजबूत आणि टिकाऊ असे व्दिपक्षीय संबंध तयार करण्यासाठी आपण काही वर्षापासून काम करत होतो. चीन हे एक मोठे आव्हान पुढे होते. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारताच्या विरोधातच एक अभियान सुरू केले आहे. यामुळे भारतीय लोकांच्या अगदी स्पष्ट म्हणणे आहे की, आपण चीनसोबत संबंध सुधारले पाहिजेत आणि ते त्यांच्याकडून केले जात आहे.
