अमेरिका आणि चीनचे वाढले टेन्शन, टॅरिफ गेममध्ये या देशाकडे तुरुपचा एक्का !

जगभरातील अर्थव्यवस्थांसाठी आता 'रेअर अर्थ' एक मोठी शक्ती म्हणून पुढे येत आहे. अमेरिकेला चीन रेअर अर्थच्या जोरावरच जुमानत नाही. त्यात आता आणखी एका देशाकडे रेअर अर्थचा मोठा साठा असल्याने त्या देशाची चांदी होणार आहे.

अमेरिका आणि चीनचे वाढले टेन्शन, टॅरिफ गेममध्ये या देशाकडे तुरुपचा एक्का !
| Updated on: Oct 25, 2025 | 4:17 PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने अनेक देशांचा व्यापार संकटात आलेला आहे. चीन आणि भारत यांच्या सह ब्राझील यांना मोठा टॅरिफ लावला आहे. मात्र, ब्राझील या देशाकडे मोठा तुरुपचा एक्का आहे. जो संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची दिशा बदलू शकतो. आणि तो म्हणजे रेअर अर्थ एलिमेंटचे समृद्ध भंडार होय. हा खनिजांचा साठा त्या १७ धांतूचा समूह आहे.ज्याची आज प्रत्येक उच्च तंत्रज्ञानात गरज आहे. मग इलेक्ट्रीक कार असो,सोलर पॅनल असो, मोबाईल फोन असो वा थेट जेट इंजिन की मिसाईल सिस्टीम..

चीननंतर ब्राझीलकडे सर्वात मोठे भंडार

चीननंतर आता ब्राझीलकडे जगातील दुसरा सर्वात मोठा रेअर अर्थ साठा आहे. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार चीनच्या जवळ सुमारे ४४ दशलक्ष मेट्रीक टनाचा स्टॉक आहे. तर ब्राझीलकडे सुमारे २१ दशलक्ष टन साठा आहे. यामुळे या खनिजांना भू-राजकीय हत्यार म्हटले जात आहे. या खनिजांना नियंत्रित करणारा देश याच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम करु शकतो.

ट्रम्प आणि लूला यांच्या भेटीची शक्यता

ब्राझील आणि अमेरिकेच्या दरम्यान अनेक महिन्यांपासून टेरिफवरुन तणाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलमधून येणाऱ्या काही निर्यातीवर ५० टक्के टॅरिफ शुल्क लावले आहे. ट्रम्प यांचा आरोप आहे की ब्राझीलने त्यांचे डावे सहकारी जेअर बोल्सोनारो यांच्या विरोधात चाललेल्या खटल्यात राजकीय बदल्याची भावना दाखवली आहे.

आता या मुद्यावर क्वालालंपुर येथे होणाऱ्या ASEAN परिषदेत ट्रम्प आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्या दरम्यान भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांनी स्पष्ट केले आहे की ते ट्रम्पकडून गाझा, युक्रेन, रशिया, व्हेनेजुएला आणि रेअर अर्थ मॅगनेट प्रत्येक मुद्यावर बोलणी करण्यासाठी तयार आहेत.

खनिजांमुळे उघडला संधीचा दरवाजा

ब्राझीलचे खणन आणि ऊर्जा मंत्री एलेक्जेंडर सिल्वेरा यांनी म्हटले आहे की चीन आणि अमेरिकेतील वाढत्या अविश्वासामुले त्यांच्या देशातील संधीची कवाडे उघडली गेली आहेत. ते म्हणाले की ब्राझीलची खनिज क्षमता आणि अमेरिकन गुंतवणूकी दरम्यान आता नव्या हितसंबंधाचे वारे वाहू शकते.

वास्तविक अनेक अमेरिकन कंपन्या आधीपासूनच ब्राझीलच्या दुर्लभ मृदा प्रोजेक्टवर पैसा लावत आहेत. अर्थात आता ही गुंतवणूक मुख्यत: खणनपर्यंत मर्यादित आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार ब्राझीलला केवळ खणनपर्यंत थांबायचे नाही. तर खनिजांचे पृथक्करण आणि मॅग्नेट निर्माण सारख्या उन्नत प्रक्रीयेत देखील उतरायचे आहे.

चीनच्या भागीदारीचाही पर्याय

ET च्या एका रिपोर्टनुसार ब्राझीलचे रेअर अर्थ विशेषज्ज्ञ गिल्बर्टो फर्नांडिस डी यांचे म्हणणे आहे जर ब्राझील या क्षेत्रात वेगाने पुढे येऊ इच्छीत असेल तर त्याला चीनसोबत तांत्रिक भागीदारी करायला हवी. त्यांनी सांगितले की या क्षेत्रात चीनचा अनुभव सर्वात जास्त आहे.

विशेष बाब म्हणजे चीन आधीपासूनच ब्राझीलचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. आणि त्यांच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. दोन्ही देश ब्रिक्स समुहाचे सदस्य देखील आहेत, त्यामुळे हे नाते आणखीन दृढ होणार आहे. परंतू जर ब्राझील चीनच्या जवळ गेला तर हे पाऊल ट्रम्प प्रशासानला नाराज करू शकते.

ब्राझीलला जागतिक पातळीवर मोठी संधी, पण…

आज ब्राझीलची स्थिती महत्वाची आहे. एकीकडे अमेरिकन भांडवल आणि व्यापारिक लाभाचे आकर्षण आहे तर दुसरीकडे चीनची तांत्रित क्षमता आणि गुंतवणूकीची ताकद. दोन्हींमध्ये संतुलन बनवणे सरकारसाठी सोपे नसणार आहे. ब्राझीलची स्थिती जटील आहे.परंतू ही त्यांची ताकदही आहे.