भारतावर होणार सर्वात मोठा दहशतवादी हल्ला? पाकिस्तानातून हादरवणारी माहिती समोर, सगळे दहशतवादी…

भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हैराण आहे. परंतु आता पाकिस्तानात असलेले कुख्यात दहशतवादी भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. तसा कट रचला जातोय.

भारतावर होणार सर्वात मोठा दहशतवादी हल्ला? पाकिस्तानातून हादरवणारी माहिती समोर, सगळे दहशतवादी...
terrorist attack
Image Credit source: tv9 marathi
Prajwal Dhage | Updated on: Jan 14, 2026 | 4:27 PM

Attack On Attack : भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची झोप उडालेली आहे. भारताला कसे अडचणीत आणता येईल, यासाठी पाकिस्तान नेहमीच प्रयत्न करतो. दरम्यान, सध्या भारताला चिंतेत टाकणारी एक गुप्त माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या पाकिस्तानातील लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद या दोन बड्या दहशतवादी संघटना भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठीच या दोन्ही दहशतवादी संघटनांमधील बड्या दहशतवाद्यांची एक संयुक्त बैठक झाली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली असून यात भारतावर हल्ला करण्याविषयीही खल झाला आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेतील मोठ्या पदावर असलेले दहशतवादी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या कॅम्पवर दिसून आले आहेत. मंगळवारी (13 जानेवारी) पाकिस्तानातील बहावलपूर येथे दोन्ही दहशतवादी संघटनांचे टॉपचे दहशतवादी एकत्र दिसून आले आहेत. बहावलपूर हा जैश ए मोहम्मद संघटनेचा गड आहे. इथेच कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा मुख्य कँप आहे. बहावलपूर येथे झालेल्या बैठकीत लष्कर ए तैयबाचा कुख्यात दहशतवादी हाफीज सईदचा मुलगा तल्हा सईद, लष्करचा डेप्यूची चिफ सैफुल्ला कसुरी, हाफीज अब्दुल रऊफ आदी दहशतवादी उपस्थित होते.

दहशतवादी रचतायत भारताविरोधात हल्ल्याचा प्लॅन

या बैठकीनंतर भारताची गुप्तचर संघटना सक्रीय अलर्ट मोडवर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मौलाना मसूद अझहर आणि रऊफ असगर हे भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहेत. भारतावर आयईडीच्या माध्यमातून हल्ला करण्याची त्यांची योजना असल्याचे बोलले जात आहे.

दहशतवाद्यांना भारतात पाठवलं जातंय

भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार जैश ए मोहम्मद या संघटनेचे अल कायदा, तालिबान, हक्कानी नेटवर्कशी चांगले जवळचे संबंध आहे. या सर्व संघटना मिळून भारतावर आयईडी हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. जैशचा कमांडर मोहम्मद मुसद्दिक आणि मसुद कश्मिरी हे दोघे जण काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांना या हल्ल्यासाठी सूचना करत आहेत. मोहममद मुसद्दिक हा सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांना भारतात पाठवण्यासाठी मदत करतो आहे.

दरम्यान, पाकिस्तानातील मोठ्या दहशतवादी संघटनांनी एकत्र येत दहशतवादी हल्ला करत असतील तर भारतासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. भारताने अलर्ट मोडवर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.