AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tesla | टेस्ला सापडली अडचणीत, कंपनीवर झाला आता हा आरोप

एकीकडे अब्जाधीश इलॉन मस्क यांची इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्ला भारतात येण्याचा प्रयत्न करीत असताना तिकडे अमेरिकेत मात्र कंपनीवर नवनवीन आरोप होत असल्याने कंपनीला दंड भरावा लागत आहे.

Tesla | टेस्ला सापडली अडचणीत, कंपनीवर झाला आता हा आरोप
tesla logoImage Credit source: socialmedia
| Updated on: Sep 29, 2023 | 9:09 PM
Share

न्युयॉर्क | 29 सप्टेंबर 2023 : अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क ( Elon Musk  )  यांची इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्ला ( Tesla ) पुन्हा अडचणीत सापडली आहे. अमेरिकेतील समान रोजगार संधी आयोगाने कंपनीवर वांशिक भेदभाव केल्याचा खटला दाखल केला. टेस्ला कंपनीच्या इलेक्ट्रीक कार ब्रँड कॅलीफोर्निया येथील प्लांटमध्ये अल्पसंख्यांकासाठी योग्य वातावरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे टेस्ला कंपनीच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे.

टेस्लावर आधी ही तिच्या माजी कर्मचाऱ्यांनी फ्रेमोंट कारखान्यात वांशिक भेदभाव केल्याच्या तक्रारी केल्या आहेत. परंतू कंपनीने मात्र या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. परंतू यावेळी अमेरिकन समान रोजगार संधी आयोग इलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीवर कारवाई करणार आहे. कंपनीवर आरोप आहे की त्यांनी अश्वेत कामगारांवर गंभीर किंवा व्यापक स्वरुपाचा वांशिक भेदभाव केला. तसेच या प्रकरणी तक्रार करणाऱ्यांवर कंपनीने कारवाई देखील केली आहे.

टेस्ला कंपनीला कॅलिफोर्नियातील नागरिक अधिकार संस्थेच्या आरोपाचाही सामना करावा लागत आहे. अश्वेत कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण केल्याच्या तक्रारींकडे डोळेझाक केल्याचा आरोप केला आहे. ओवेन डीयाज याने 2017 मध्ये टेस्ला विरोधात खटला दाखल केला होता. त्याने कंपनीवर वांशिक भेदभाव आणि शत्रूतापूर्ण वातावरण केल्याचा आरोप केला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये या प्रकरणात कोर्टाने टेस्लाला 137 मिलीयन डॉलर भरपाईचा आदेश दिला होता. त्यानंतर कंपनीने आवाहन दिले.

कंपनीच्या प्रतिमेला धक्का

अखेर टेस्ला 3.2 मिलियन डॉलर ( सुमारे 26 कोटी 58 लाख रु.) भरपाईचा आदेश मिळाला होता. याला कंपनीने आपला विजय मानला, परंतू कंपनीची प्रतिमा धुळीस मिळाली. फ्रेमोंटचा प्लांटमध्ये मॉडेल 3, मॉडेल एस, मॉडेल वाय आणि मॉडेल एक्स सारख्या लोकप्रिय मॉडेलची निर्मिती होते. कंपनीची विक्री आणि उत्पादन वाढले आहे. परंतू मॅन्युफॅक्चरींग प्लांटचा हिस्सा बनण्यासाठी नियुक्त केलेल्या सर्वांसोबत काही योग्य घडत नाही.

Follow Us
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल