
एका प्राचीन हिंदू मंदिरासाठी दोन आशियाई देशांत युद्ध छेडले गेले आहे. दोन्ही देश एकमेकांवर बॉम्ब वर्षाव आणि तोफगोळे डागत आहेत. या संर्घषात किमान १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे. हे दोन देश थायलंड आणि कंबोडीया आहेत. येथे हिंदू मंदिरांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे या दोन्ही देशात बौद्ध धर्माचे लोक रहातात. बौद्ध धर्माच्या लोकांची संख्या दोन्ही देशांत नव्वद टक्क्यांहून अधिक आहे. या देशांच्या सीमेवर गेल्या आठवड्यात मोठी हिंसक संघर्ष झाला. या दरम्यान कंबोडियाने थायलंडवर रॉकेट डागले तर प्रत्युत्तर देताना थायलंडने एअरस्ट्राईक केला. थायलंडने एअरस्ट्राईक का केला ? गेल्या आठवड्यात गुरुवारी सीमेवर किमान सहा भागात चकमकी झडल्याचे थायलंडच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता सुरासंत कोंगसीरी यांनी सांगितले. हा संघर्ष सुरु होण्याआधी सीमेवरील एका लँडमाईन स्फोटात थायलंडचे ५ सैनिक जखमी झाले होते, यात एक थाई सैनिकांचा पाय उडाला होता. त्यांनंतर थायलंडने कंबोडीयातून...