जगातील सर्वात एकाकी घर, चोहो बाजूंनी समुद्र, ना रस्ता, ना शेजारी, मग इथं राहतं तरी कोण?
Loneliest House of World: जगातील एकाकी घराची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. हे घर अथांग समुद्रातील एका बेटावर आहे. इथं दूर दूरपर्यंत कोणीच राहत नाही, ना इथं जाण्यासाठी धड रस्ता आहे. कुठे आहे हे सर्वात एकाकी घर?

Ellioaey Island Alone Home: असे एक घर आहे, ज्याचे लोकेशन, ठिकाण्यामुळे ते जगभरात चर्चेचा, कौतुहलाचा विषय ठरले आहे. एका बेटावरील डोंगराच्या मध्यभागी हे घर तयार करण्यात आले आहे. या बेटाला चोहो बाजूने समुद्राचा वेढा आहे. हे घर या बेटावर एखाद्या ठिपक्याप्रमाणे दिसते. पण इतक्या अवघड ठिकाणी हे घर का बांधलं असेल असा सवाल अनेकांना पडतो. हे घर एखाद्या हॉलिवूड चित्रपटाचा सेट तर नाही ना? एखाद्या अब्जाधीशाचा आलिशान बंगला तर नाही ना? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहे. हे घर तसं रहस्यमयच आहे. कारण इतक्या अवघड ठिकाणी आणि एकाकी ते घर बांधण्यात आले आहे. त्याच्याविषयी त्यामुळेच अनेकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हे जगातील एकाकी घरापैकी एक मानले जाते.
कुठे आहे हे घर?
आईसलँडच्या दक्षिणी किनाऱ्यापासून दूर अंतरावरील एलिडाए (Ellioaey) नावाच्या एका छोट्या बेटावर हे घर आहे. या बेटाच्या चोहो बाजूने समुद्र, उंच डोंगर आणि वेगवान वारे वाहते. या बेटावर कोणी फारसं राहत नाही. या बेटावर पोहचण्यासाठी बोटी, जहाज, नाव, होडीशिवाय दुसरा पर्याय नाही. हवामान खराब असेल. समुद्राला भरती असेल, मुसळधार पाऊस पडत असेल तर या बेटावर येणं जवळपास अशक्य होते. पण याच बेटावर जगातील एकाकी घर आहे.
रहस्यमयी नाही तर एक खास शिकारीचं ठिकाण
सोशल मीडियावर एक दावा नेहमी करण्यात येतो की हे घर अब्जाधीशाचं खासगी घर आहे आणि ते गेल्या कित्येक वर्षात उघडण्यात आलेले नाही. पण त्याची सत्यता वेगळीच आहे. हे पांढरं घर हे Ellioaey Hunting Association चे एक हॉंटिंग लॉज आहे. म्हणजे शिकारीचं ठिकणा आहे. हे घर 1950 साली बांधण्यात आले होते. जेव्हा पफिन (Puffin) नावाच्या समुद्री पक्षाचा हंगाम येतो. तेव्हा त्यांची शिकार करण्यासाठी या संस्थेचे काही सदस्य येथे राहतात. म्हणजे हे घर भूतबंगला नाही तर तात्पुरते राहण्याचे ठिकाण आहे.
ना वीज ना पाणी, तरीही राहण्याची व्यवस्था
या घरात राहण्यासाठीच्या कोणत्याही व्यवस्था नाही. येथे आधुनिक सोयी-सुविधा नाहीत. इथं ना वीज आहे, ना पाणी. इथं सांडपाण्याची व्यवस्थाही नाही. पण इथं पावसाळ्यात पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे पाणी वर्षाच्या एका हंगामात उपयोगी ठरते. या ठिकाणी राहण्यासाठी येताना आवश्यक साधनं या संस्थेची लोक सोबत घेऊन येतात. यामुळे इथं काही दिवस राहणे सोयीस्कर होते.
याठिकाणी अनेक पर्यटक, फोटोग्राफर आणि काही दिवस हवापालट करण्यासाठी लोक येतात. त्याअगोदर या संस्थेची परवानगी घ्यावी लागते. कारण हे ठिकाण अवघड भागात असल्याने आणि कुणाचा जीवाला धोका होऊ नये यासाठी अगोदरच वर्दी द्यावी लागते. इथं संवादाची साधणं नसल्यानेही अडचण होते. पण अनेक जण एक थ्रील म्हणून इथं राहायला जात होते.