AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायल आणि इराणमध्ये वाढला तणाव, अमेरिकेने उचललं मोठं पाऊल

israel-Iran Tension : इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढला आहे. जगापुढे पुन्हा एकदा नव्या संघर्षाची शक्यता आहे. या संघर्षात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. युद्ध कोणालाच परवडणारे नाही. म्हणून अमेरिकेने देखील महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

इस्रायल आणि इराणमध्ये वाढला तणाव, अमेरिकेने उचललं मोठं पाऊल
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 03, 2024 | 10:43 PM
Share

हमासचा प्रमुख इस्माईल हनियाच्या हत्येनंतर जगात पुन्हा एकदा तणाव वाढू शकतो. इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती आहे. त्यामुळेच अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिका मध्यपूर्वेत अतिरिक्त लढाऊ विमाने तैनात करणार आहे. इतकंच नाही तर नौदल युद्धनौका देखील तैनात करणार आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, इराण आणि हमास तसेच हिजबुल्लाह यांच्याकडून मिळालेल्या धमक्या लक्षात घेता अमरिकेने हा निर्णय घेतला आहे.

इराण करु शकतो हल्ला

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी मध्यपूर्व आणि युरोपमध्ये अतिरिक्त नौदलाचे जहाज आणि विमानं पाठवण्यास मान्यता दिली आहे. जे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे खाली पाडू शकतात. याशिवाय अमेरिका येथे लढाऊ विमानांचा अतिरिक्त स्क्वॉड्रनही तैनात करत आहे.

यासंदर्भात पेंटागॉनने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी अमेरिकेला अमेरिकेच्या सैन्याची सुरक्षा सुधारण्यासाठी, इस्रायलचे संरक्षण करण्यासाठी आणि लष्करी समायोजनाच्या आदेशाला सामोरे जाण्यासाठी अमेरिका तयार असल्याची खात्री केली आहे.

यााधी अशी चर्चा होती की, अमेरिका ‘यूएसएस थिओडोर रुझवेल्ट कॅरियर स्ट्राइक ग्रुप’च्या जागी आणखी कोणाला तैनात करेल. मात्र अमेरिकेने या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. ऑस्टिनने ‘यूएसएस थिओडोर रुझवेल्ट कॅरियर स्ट्राइक ग्रुप’च्या जागी ‘यूएसएस अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राइक ग्रुप’ तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पेंटागॉनने सांगितले की, यामुळे जमिनीवर आधारित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत होईल.

मध्यपूर्वेत तणाव वाढला

इराणमध्ये हमासचे नेते इस्माईल हनिया यांच्या हत्येनंतर अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलला धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे. इस्माईल हनिया इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची भेट घेतली. हमासने म्हटले होते की, बुधवारी तेहरानमधील हनियाच्या घरात स्फोट घडवून आणण्यात आले. हमासने यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना