मित्र मित्र म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला काढा, भारताला झटका, थेट टॅरिफ..

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील हे सांगणे कठीण आहे. इराणसोबतच्या युद्धाच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा आता टॅरिफकडे वळवला आहे. थेट मोठा दणका दिला.

मित्र मित्र म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला काढा, भारताला झटका, थेट टॅरिफ..
Donald Trump
| Updated on: Jun 03, 2026 | 10:06 AM

भारत आणि अमेरिकेचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तसे तणावात आहेत. डोनाल्ड ट्रम्प त्यांना जेव्हा मर्जी येते, त्यावेळी ते भारत महान देश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत, असे म्हणतात. मात्र, त्यांचा मुड बदलला तर थेट भारताला नरकाचा दरवाजा देखील म्हणतात. H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल करून त्यांनी भारताला मोठा दणका दिला. हेच नाही तर भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारतावर अमेरिकेने तब्बल 200 टक्के टॅरिफ लावला. ज्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेच्या मार्केटमध्ये पाठवणे जवळपास बंदच झाले. त्यानंतर हा टॅरिफ कमी करण्यात आला. मात्र, याकरिता भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करावी लागली. रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा देश चीन आहे. मात्र, या चीनवर टॅरिफ लावण्याची हिमत अमेरिकेने केली नाही.

शिवाय व्यापार करार पूर्ण करण्याकरिताही अमेरिकेचा मोठा दबाव भारतावर आहे. शेवटी भारताला ज्याची भीती तेच घडताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला मोठा झटका दिला. पुन्हा एकदा भारतावर टॅरिफ लावला जात आहे. चीन, बांगलादेश यांच्यावरही टॅरिफ अमेरिका लावणार आहे. फक्त पाकिस्तानला सूट दिल्याचे दिसतंय. अमेरिकेने भारतासह 60 देश आणि अर्थव्यवस्थांविरुद्ध मोठ्या व्यापारी कारवाईचा प्रस्ताव दिला आहे.

ज्याने एकच खळबळ उडाली. अमेरिकेच्या एजन्सींनी व्यापारातील नुकसान सांगत अतिरिक्त शुल्क लावण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावात भारताच्या नावाचा देखील उल्लेख आहे. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 1947 च्या अमेरिकन व्यापार कायद्याच्या कलम 301 अंतर्गत केलेल्या तपासानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, 60 अर्थव्यवस्थांची धोरणे आणि कार्यपद्धती अमेरिकेच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम करत आहेत.

त्यामध्ये टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव देण्यात आला. या 60 देशात भारताच्या शेजारी देशांच्या नावाचा उल्लेख आहे. फक्त पाकिस्तानवर अमेरिका मेहरबानी करताना दिसत आहे. ज्याने एकच खळबळ उडाली. भारतावर पुन्हा एकदा टॅरिफचे मोठे संकट असल्याचे बघायला मिळत आहे. एकतर इराण आणि अमेरिका युद्धातून भारत मार्ग काढत आहे तर आता दुसरे टॅरिफचे संक उभे आहे.

Follow Us