सुर्य मावळताच त्यांचे शरीर इन एक्टीव्ह होते, दोन भावांची भंडावून सोडणारी कहाणी

तुम्ही काही वर्षांपूर्वी हृतिक रोशनचा 'कोई मिल गया' हा चित्रपट पाहिला असेल त्यात 'जादू' हा एलियन केवळ सुर्य प्रकाशावर काम करु शकतो. तसाच एक विचित्र आजार दोघा भावांमध्ये आढळला आहे.

सुर्य मावळताच त्यांचे शरीर इन एक्टीव्ह होते, दोन भावांची भंडावून सोडणारी कहाणी
Balochistan Solar kids
Updated on: Nov 28, 2025 | 10:14 PM

जगभरात अनेक प्रकारचे आजार असतात. काही सर्वसाधारण, तर काही दुर्लभ आणि काही असे की ज्यांच्यावर विश्वास ठेवणेही कठीण होईल. आपण रात्री थकून झोपून जातो. परंतू हे सर्वांच्याच बाबतीत घडते. परंतू जगात अशीही मुले आहेत जी केवल सुर्य मावळण्या आधीच सर्वसामान्य सारखी असतात आणि सुर्य मावळला की त्यांचे शरीर संपूर्णपणे निष्क्रीय होते. तुम्हाला वाटेल की असे कधी घडू शकते का ? परंतू हे खरे आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानात राहणाऱ्या दोन भावांची ही व्यथा आहे. डॉक्टरांना देखील यांचा आजार पाहून आश्चर्य वाटले आहे. पृथ्वीवर असा आजार कोणालाच नाही.त्यामुळे डॉक्टरांनी या दोघा भावांना सोलर किड्स असे नाव दिले आहे.

कसला आहे हा विलक्षण आजार ?

बलूचिस्तानच्या एका छोट्या गावात राहणार दोन भाऊ दिवसाच्या उजेडात सामान्य मुलांसारखेच खेळतात, बागडतात अभ्यास आणि मस्ती देखील करतात. परंतू एकदा का सुर्यास्त झाला की ते एकदम एनर्जी संपल्यासारखे निस्तेज आणि मलूल होऊन एका जागी पडतात. त्यांचे हातपाय ढीले होतात. चालणे-फिरणे बंद होते. बोलता येत नाही रात्र होताच ते एकदमच इनएक्टीव्ह होतात. जसे कोणी त्यांच्या शरीराचा स्वीच ऑफ केला आहे. त्यांचे पालक सांगतात की त्यांची मुले रात्री बिलकुल हलू शकत नाहीत. जर ते बाहेर असतील तर त्यांच्या कुटुंबियांना बाहेरुन उचलून घरात आणावे लागते !

सोलर बॉय का म्हणतात ?

हे दोघे भाऊ केवळ दिवसा सुर्य असतानाच सामान्य मुलांप्रमाणे वागतात. परंतू सुर्याचा प्रकाश कमी झाला तर त्यांची ताकदच गायब होते. शरीर असा व्यवहार करते की जणू काही सुर्यापासूनच त्यांना एनर्जी मिळत आहे. मात्र, डॉक्टरांनी स्पष्ट केले की हा केवळ प्रकाशामुळे नव्हे तर आतील काही आजाराचाही परिणाम असू शकतो. यांच्या शरीराची दिवस-रात्रीही प्रतिक्रीया इतकी अनोखी आहे की त्यांना सोलर किड्स म्हटले जात आहे.

जगभरात केवळ एक कुटुंब या आजाराने पीड़ित?

डॉक्टरांच्या मते अशी केस जगात दुसरी नाही.तज्ज्ञांच्या मते हा आजार काही जेनेटीक बदलाशी संबंधित आहे. मज्जासंस्थेची ही गडबड शरीराच्या ऊर्जा निर्मिती प्रणालीमध्ये गंभीर कमतरतेमुळे झाली असावी असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र या आजाराचे खरे कारण समजलेले नाही. त्यांच्या रक्ताचे नमूने, माती आणि हवेची तपासणी केली आहे.परंतू निदान अजून स्पष्ट झालेले नाही. डॉक्टरांनी याचा उपचार डोपामाईन मेडिसिन सांगितला आहे. दोघा भावांना हे औषध देऊन रात्रीचेही एक्टीव्ह केले गेले आहे. हे औषध दिल्यानंतर हे दोघे रात्रीचे स्वत:हून चालू शकले.