रशियामुळे भारत संकटात? तेल पुरवठा झपाट्याने कमी, भारताचा होतोय डबल गेम? अमेरिकेने…

भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता विविध प्रकारे भारतावर दबाव टाकण्याचे काम झाले. मात्र, असे असतानाही भारताने अजिबात दाद अमेरिकेला दिली नाही. मात्र, आता भारतासाठी वाईट बातमी पुढे येताना दिसतंय.

रशियामुळे भारत संकटात? तेल पुरवठा झपाट्याने कमी, भारताचा होतोय डबल गेम? अमेरिकेने...
crude oil exports from Russia to India
| Updated on: Nov 04, 2025 | 8:57 AM

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावला. फक्त टॅरिफच नाही तर सतत अमेरिकेकडून भारतावर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, असे स्पष्ट अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेने दावा करत म्हटले की, भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार असून नरेंद्र मोदी यांना याबद्दल आम्हाला विश्वास दिला. आता खरोखरच भारत रशियाकडून तेल खरेदी हळूहळू करून कमी करताना दिसतोय. येणाऱ्या आकडेवारी धक्कादायक नक्कीच आहे. कारण भारतीय तेल कंपन्यांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी कमी केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

22 ऑक्टोबर रोजी अमेरिकेने रशियन तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइलवर थेट निर्बंध लादले. या दोन कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादल्याने भारतातील रशियन तेल पुरवठा कमी झाल्याचे दिसतंय. डेटानुसार, 27 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात रशियाकडून भारतात कच्च्या तेलाची निर्यात सरासरी 1.19 दशलक्ष बॅरल प्रतिदिन होती. ही आकडेवारी मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

दोन आठवड्यांतील 19.5 लाख बॅरल प्रतिदिन पेक्षा खूप कमी आहे. अमेरिकेने रशियाच्या दोन मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादली आहेत. विशेष म्हणजे सर्वाधित तेल निर्यात या दोन कंपन्या करत होत्या. दोन कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतरच भारतात येणाऱ्या तेलाची आयात कमी झाल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. आता यामधून भारत नेमका कसा मार्ग काढतो हे देखील पाहण्यासारखे ठरेल.

27 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात रोझनेफ्टची भारतात होणारी तेल निर्यात दररोज 0.81 दशलक्ष बॅरलपर्यंत घसरली, जी मागील आठवड्यात 1.41 दशलक्ष बॅरल होती. अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांनंतर ल्युकोइलने भारतात कोणतेही तेल पाठवले नाही. यामुळे आता पुढील काही दिवसात तेलाचे मोठ संकट अनेक देशांमध्ये उभे राहण्याचे स्पष्ट संकेत नक्कीच आहेत. भारताच्या तेल रिफायनरी कंपन्या देखील अडचणीत सापडल्याचे यावरून दिसतंय. ल्युकोइल कंपनीवर अनेक भारतीय कंपन्या अवलंबून होत्या. अमेरिकेकडूनही भारताने तेलाची मोठी आयात केली आहे.