आणखी एक धोका, 500 टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाकडे..

टॅरिफ या शब्दानेच जगाचे टेन्शन वाढताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी टॅरिफ हा शब्द सध्या एकदम आवडत्या शब्दांपैकी एक बनला आहे. मात्र, जगाचे याने टेन्शन वाढवले आहे. आता अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आलाय.

आणखी एक धोका, 500 टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाकडे..
Donald Trump Tariffs
| Updated on: Oct 17, 2025 | 10:31 AM

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचे धक्कादायक विधान करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धक्का दिला. हेच नाही तर त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यात संवाद झाला असून त्यांनी मला सांगितले की, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानावर भारताने आपली भूमिका स्पष्टपणे मांडत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणत्याही पद्धतीचा संवाद झाला नाही किंवा त्यांचे फोनवरही बोलणे झाले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा खोटारडेपणा जगापुढे यानिमित्ताने आला. भारतानंतर रशियावरही मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला.

दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या निर्बंधामुळे आपण चीनवर टॅरिफ लावत असल्याचे सांगत अमेरिकेने काही गंभीर आरोपही केली. चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. चीन देखील अमेरिकेच्या विरोधात कारवाई करण्याच्या तयारीत आहे. चीनविरोधात अजून कडक भूमिका घेण्याच्या तयारीत अमेरिका असल्याचे स्पष्ट दिसतंय. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक तणावात येण्याचे अधिक संकेत आहेत.

वॉशिंग्टनमध्ये आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीदरम्यान सीएनबीसी इन्व्हेस्ट इन अमेरिका फोरममध्ये बोलताना बेसंट म्हणाले की, चीनवर 500 टक्के टॅरिफ लावण्यासाठी सिनेटकडून जोरदार पाठिंबा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेत व्यापार तणाव टोकाला पोहोचला.अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट म्हणाले, अमेरिकन सिनेट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चिनी आयातीवर 500 टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्याचा व्यापक अधिकार देण्यास तयार आहे.

थोडक्यात काय तर डोनाल्ड ट्रम्प हे चीनवर 500 टक्के टॅरिफ लावू शकतात. सध्या चीनवर 500 टक्के टॅरिफ लावण्याचा विचार केला जात आहे. चीन मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेन युद्धाला रशियाला पैसा पुरवला जात असल्याचे सांगून चीनवर 500 टक्के टॅरिफ लावण्याचा विचार हा केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जर चीनवर इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला तर मोठी खळबळ येण्याची दाट शक्यता आहे.