America Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुड न्यूज, वाईट करायला गेले पण घडलं उलटं

America Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलाय. भारताच नुकसान करणं हा डोनाल्ड ट्रम्प यांचा उद्देश आहे. पण त्यांच्यासाठी एक बॅड न्यूज आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुड न्यूज आहे.

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुड न्यूज, वाईट करायला गेले पण घडलं उलटं
india-us
| Updated on: Sep 15, 2025 | 4:48 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. पण भारतासाठी मात्र गुड न्यूज आहे. डोनाल्ड ट्रम्प भारताच वाईट करायला गेले. पण उलटच घडलं आहे. हा डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या विचारांच्या समर्थकांसाठी मोठा झटका आहे. भारताचा ट्रेड डिफिसट म्हणजे व्यापारी तूट ऑगस्ट 2025 मध्ये कमी होऊन 26.49 अब्ज डॉलर झाली आहे. जुलैमध्ये ही व्यापारी तूट 27.35 अब्ज डॉलर होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतर ट्रेड डिफिसट वाढणार अशी शक्यता होती. पण जुलै महिन्याच्या तुलनेट व्यापारी तूट कमी झालीय. हा ट्रम्प यांच्यासाठी एक धक्काच आहे.

व्यापार मंत्रालयाकडून सोमवारी आकडे जाहीर करण्यात आले. भारताचा वस्तू व्यापार नुकसान ऑगस्ट महिन्यात 26.49 अब्ज डॉलर आहे. जुलै महिन्यात हाच व्यापारी तुटीचा आकडा 27.35 अब्ज डॉलर होता. आयात मागच्या महिन्यात 64.59 अब्ज डॉलर होती, ती कमी होऊन 61.59 अब्ज डॉलरवर आलीय.

भारतासाठी अमेरिका एक मोठ मार्केट का?

रॉयटर्सच्या एक सर्वेनुसार, इकोनॉमिस्ट्सनी अंदाज लावलेला की, ऑगस्ट महिन्यात ट्रेड डेफिसिट 25.13 अब्ज डॉलर राहील.जुलै महिन्यात हाच ट्रेड डेफिसिट 27.35 अब्ज डॉलर होता. भारत आणि अमेरिकेत ट्रेड डीलमध्ये बाधा येत असल्याने व्यापारात दबाव वाढला आहे. भारताच्या एकूण निर्यातीत अमेरिकन बाजारपेठेतील वाटा 20 टक्के आहे. भारतासाठी अमेरिका एक मोठ मार्केट आहे. पण चर्चेत प्रगती होत नसल्याने निर्यातीवर परिणाम झालाय. निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अलीकडेच AOSS नियमात ढील दिली. त्यामुळे एक्सपोर्ट प्रोडक्शनसाठी कच्चा माल विनाकर आयात करता येईल.

भारतावर लावण्यात आलेलं शुल्क सर्वात जास्त

भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. जुलै महिन्यात 8.01 अब्ज डॉलरने घटून 6.86 अब्ज डॉलर राहिलय. अमेरिकेने 27 ऑगस्टपासून रशियन तेल खरेदीसाठी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ शुल्क लावलं. त्यामुळे भारतीय निर्यात साहित्यावर एकूण शुल्क 50 टक्के झालं. अमेरिकेसोबत व्यापार करणाऱ्या कुठल्याही देशांमध्ये भारतावर लावण्यात आलेलं शुल्क सर्वात जास्त आहे.