
सोने पिकवणारे झाड कधी पाहिले आहे का ? फिनलँडच्या संशोधकांनी नॉर्वेच्या स्प्रुस झाडाच्या पानात सोन्याचे नॅनो पार्टीकल्स शोधून काढले आहेत. किटीला खाणींजवळ २३ झाडांच्या १३८ सँपलमध्ये ४ मध्ये सोने सापडले आहे. एंडोफाईट बॅक्टेरिया मुळांद्वारे सोने शोषून बायोफिल्म जमा करतात. या झाडात अशा प्रकारे बॅक्टेरियामुळे जमीनीतील सोने शोषले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ख्रिसमस ट्रीवर चमकणारे सिल्वर आणि गोल्ड दागिने आपण सहजवलेले पाहात असतो. परंतू असली स्प्रुसच्या झाडाच्या अणुकूचीदार पानांमध्ये लपलेले सोने आता उघडकीस आले आहे. सोन्याचे हे अंश छोट्या – छोट्या कणांच्या ( नॅनो पार्टीकल्स) रुपात असतात. फिनलँडच्या संशोधकांनी हे रहस्य शोधून काढले आहे.
नवीन संशोधनानुसार नॉर्वे स्प्रूस ( Picea abies ) नावाचे झाड बॅक्टेरियाच्या मदतीने मुळांद्वारे पाण्यासह सोन्याचे कण देखील शोषून घेतात.हे संशोधन अलिकडेच एन्व्हार्यमेंटर मायक्रोबायोम जर्नलमध्ये छापून आले आहे.
संशोधकांनी फिनलँडच्या उत्तर भागात किटीला खाणींजवळ स्प्रुस झाडांवर संशोधन केले आहे. या खाणी युरोपातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी आहेत. टीमने २३ झाडांपैकी १३८ सुयांच्या सँपल घेतले. आणि निष्कर्ष आश्चर्यजनक होते. चार झाडाच्या सुयांमध्ये नॅनो पार्टीकल्स सापडले.हे कण इतके सुक्ष्म आहेत की एका मिलीलिटरचा लाख पट त्याचा हिस्सा आहे.
या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आणि फिनलँडच्या ओऊलू युनिव्हर्सिटीच्या इकोलॉजीस्ट कैसा लेहोस्मा म्हणतात की झाडांच्या आत राहणारे बॅक्टेरिया आणि दूसरे सुक्ष्म जीव सोन्याला जमा करण्यास मदत करतात. या बॅक्टेरियांना एंडोफाइट्स म्हणतात. हे झाडांमध्ये राहणारे चांगले सुक्ष्म जीव आहेत. जे झाडांना हार्मोन्स तयार करण्यास आणि पोषक तत्व शोषण्यास मदत करतात.
झाडांची मुळे जेव्हा पाणी शोषतात त्यावेळी पाण्यात विरघळलेले सोन्याचे कण देखील ते शोषून घेतात. परंतू सोने हे विषारी असल्याने झाड यांना सुयांमध्ये जमा करु इच्छीत नाहीत. त्यावेळी हे एंडोफाईट बॅक्टेरिया कामी येतात. हे बॅक्टेरिया बायोमिनरलायझेशन प्रक्रियेने सोन्याच्या कणांना वेगळे करते.
बायोमिनरलायझेशन म्हणजे जीव त्यांच्या ऊतींमध्ये खनिजे बनवतात किंवा नियंत्रित करतात. बॅक्टेरिया सोन्याच्या कणांना घेरुन बायोफिल्म बनवतात. ही बायोफिल्स शर्करा आणि प्रोटीनपासून बनलेले असतात, जे बॅक्टेरियात झाडांच्या आत सुरक्षित असतात.
अणुकुचीदार पानात सोने इतके कमी सापडले की झाडे कापून कोणी श्रीमंत बनू शकत नाही. परंतू संशोधन सोन्याच्या संशोधनासाठी कामी येणार आहे.संशोधक म्हणतात की झाडाच्या पानात अशे बॅक्टेरिया शोधून सोन्याच्या खाणी शोधणे शक्य होणार आहे.लेहोस्मा यांनी सांगितले तकी या बॅक्टेरियाच्या स्क्रीनिंगने खाण कंपन्यांना मदत होणार आहे.