AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा 10 पट सोने भारतीयांच्या घरात, एवढी आहे त्याची किंमत

सोन्याच्या भावात अलिकडे झालेल्या दरवाढीने भारतीयांना मालामाल केले आहे. या दरवाढीने भारतीयांच्या घरात ठेवलेल्या सोन्याची किंमत आता 3.8 ट्रिलियन डॉलर झाली आहे.जी पाकिस्तानच्या जीडीपीच्या अनेकपट जास्त आहे.

पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा 10 पट सोने भारतीयांच्या घरात, एवढी आहे त्याची किंमत
| Updated on: Oct 11, 2025 | 10:30 PM
Share

सोन्याच्या किंमतीत झालेल्या मोठी दरवाढीमुळे भारतीय घरात ठेवलेल्या सोन्याचे मुल्य वाढून सुमारे 3.8 ट्रिलियन डॉलर म्हणजे सुमारे ₹315 लाख कोटी केले आहे. हे सोने देशाच्या GDP च्या सुमारे 88.8% आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या शुक्रवारी जारी केलेल्या अहवालानुसार यामुळे घरातील एकूण संपत्तीवर पॉझिटिव्ह परिणाम झाला आहे. अहवालानुसार भारतीय कुटुंबियांकडे या समयी सुमारे 34,600 टन सोने जमा केलेले आहे.

IMF च्या अंदाजानुसार वर्तमान काळात भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताचा जीडीपी सुमारे 4.18 ट्रिलियन डॉलर आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा जीडीपी सुमारे 375 बिलियन डॉलर आहे. यामुळे भारतीयांजवळ पाकिस्तानच्या जीडीपीहून 10 पट जास्त किंमतीचे सोने आहे.

सरकारच्या पावलांनी उत्पन्न वाढले

अहवालात म्हटले आहे की सोन्याने मिळणारा हा धन प्रभाव आणखीन वाढला आहे. कारण व्याज दरातील कमतरतेने लोनवर व्याजाचे ओझे घटले आहे. आणि अलिकडेच झालेल्या इन्कम टॅक्समुळे लोकांचे खर्च करण्यायोग्य उत्पन्न देखील वाढले आहे. सरकारने अलिकडेच GST कपात केली आहे.जी या वर्षाच्या सुरुवातीला केले गेलेल्या इन्कम टॅक्स कपातीहून वेगळी आहे. या उपायांचा उद्देश्य लोकांची उत्पन्न वाढवणे आहे.

सोन्याच्या किंमतीत इतकी वाढ

या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 61.8% ग्रोथ झाली आहे. आणि ही ₹ 1.27 लाख प्रति 10 ग्रॅमच्या रेकॉर्ड स्तरावर पोहचली आहे. अहवालानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देखील 2024 पासून आतापर्यंत 75 टन सोने खरेदी केली आहे. ज्यामुळे रिझर्व्ह बँकेकडील एकूण सोन्याचा साठा 880 टन झाला आहे. आणि हा भारताच्या एकूण परकीय चलनाच्या साठ्याच्या सुमारे 14% झाला आहे.

शेअरबाजारात देखील उसळी

बातमीत हेही स्पष्ट केले आहे की आर्थिक वर्ष 2024 मध्ये घरगुती आर्थिक बचतीमध्ये शेअर बाजाराचा वाटा 8.7% वरून आर्थिक वर्ष 2025 मध्ये 15.1 % या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे. तर बँकातील जमा भागीदारी 2024 च्या 40 हून घटून 2025 मध्ये 35% झाली. कोरोना साथीच्या आधी ही 46% होती. मॉर्गन स्टॅनलीच्या अंदाजानुसार येणाऱ्या काळात घरगुती गुंकवणूकीत इक्विटी (शेअर बाजार)हिस्सेदारी आणखी वाढणार आहे. कारण भारताची युवा लोकसंख्या आणि गुंतवणूकी संदर्भातील प्रशिक्षण वेगाने वाढत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.