AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीन सतत सोने खरेदी का करतोय ? भारतानेही वाढवला गोल्ड रिझर्व्ह, काय गडबड नेमकी?

सोन्याची आवड महिलांनाच नव्हे तर पुरुषांना देखील असते. परंतू सध्याचे सोन्याचे दर पाहाता सोन्याची खरेदी करणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. परंतू केवल लोकच नाहीत तर देशही सोन्याची खरेदी करु लागले आहेत.

चीन सतत सोने खरेदी का करतोय ? भारतानेही वाढवला गोल्ड रिझर्व्ह, काय गडबड नेमकी?
| Updated on: Oct 08, 2025 | 6:14 PM
Share

अनेक शतकापासून सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जात आहे. गेल्या काही दिवसात सोन्याचे दर इतक वाढत चालले आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर सोने जात आहे. साल २०२३-२४ पर्यंत ७० हजार रुपयांच्या खाली असणारे सोने २०२५ मध्ये सवा लाखाच्या पार जाईल याची कोणीही कल्पना केलेली नव्हती. या वाढत्या दरामागे लोकांद्वारे सोन्याची खरेदी नसून मोठ – मोठ्या देशांद्वारे सोन्याचा साठा वाढवणे कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या २ ते ३ वर्षात अनेक देशांच्या रिझर्व्ह बँकेने सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. सर्वाधिक सोने खरेदीत चीनचे नाव टॉपवर आहे. चीन गेल्या काही वर्षांपासून लागोपाठ सोने खरेदी करत आहे.परंतू का ? जाणून घेऊयात…

चीनच्या सेंट्र्ल बँक म्हणजे पीपल्स बँक ऑफ चायनाने २०२५ मध्येही सोने खरेदी सुरुच ठेवली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान चीनने ३९.२ टन सोने खरेदी केले आहे. ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चीनच्या जवळ एकूण २,२९८.५ टन सोने जमा झाले आहे. चीनने गेल्या ११ महिन्यात ब्रेक न घेता सोने खरेदी सुरु ठेवली आहे. दर महिन्यास सरासरी २ ते ५ टन सोने खरेदी चीन करत आहे. सप्टेंबर महिन्यात यात थोडी कमतरता आली, या सप्टेंबरात चीनने केवळ ०.४ टन सोने खरेदी केले होते.

डॉलरची दादागिरी समाप्त करणे

चीन इतके सोने खरेदी का करत आहे. याचे पहिले कारण आहे अमेरिकन डॉलरवरील आपले अवलंबित्व चीन कमी करु इच्छीत आहे. चीनच्या जवळ मोठ्या प्रमाणात डॉलरचा साठा आहे. परंतू चीन त्याचे भविष्य डॉलरवर विसंबून देऊ इच्छीत नाही. डॉलर केवळ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर टीकून आहे.परंतू सोने कोणा देशाच्या चलनावर अवलंबून नाही. त्यामुळे त्याला सुरक्षित पर्याय मानले जात आहे. दुसरे कारण आहे जगात वाढत चाललेला तणाव आणि अनिश्चतेचे वातावरण म्हटले जात आहे. रशिया- युक्रेन युद्धानंतर चीन सारखे देश त्यांचा पैसा अशा ठिकाणी गुंतवत आहेत, ज्यास कोणी सहजासहजी खेचू शकत नाही. रशियासोबत जे झाले त्याने अनेक देशांना सर्तक केले आहे.

तिसरे मोठे कारण म्हणजे वाढती महागाई आहे. २०२५ मध्ये सोन्याची किंमत सुमारे ३,९०० डॉलर प्रति औंसापर्यंत पोहचली होती. जेव्हा वस्तूंचे दर वाढतात, तेव्हा सोने त्याची किंमत कायम ठेवते आणि पैशांची ताकदीला ती कोसळण्यापासून वाचवते. त्यामुळेच चीन सोन्याला मजबूत आर्थिक कवच म्हणून पाहात आहे. तसेच चीनला त्याच्या स्वत:च्या चलनाची ताकद जगात वाढावी असे वाटत आहे. सोन्याचा मोठा साठा त्याची ही इच्छा पूर्ण करण्यास मदत करु शकतो.

चीनच नाही तर अनेक देश हेच करताहेत

सोन्याची खरेदी करणारा चीन एकटाच नाही. भारत, रशिया आणि तुर्की यांसारखे अनेक देशातील सेंट्रल बँका देखील अलिकडच्या काळात लागोपाठ सोने जमा करत आहेत. २०२२ पासून दरवर्षी जगातील सेंट्रल बँका १,००० टनाहून अधिक सोने खरेदी करत आहेत. याचे कारण देखील तेच आहे की डॉलर पासून अंतर राखणे, जागतिक तणाव, महागाई आणि दीर्घकालिन रणनिती. देशांना आता कळेल आहे की सोने केवळ दागिन्यांसाठी नव्हेतर आर्थिक सुरक्षेसाठी देखील महत्वाचे आहे.

भारतही सोन्याच्या प्रेमात …

भारताचा विचार करता आरबीआयच्या जवळ देखील मोठा सोन्यचा साठा आहे. ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारताकडे ८८० टन सोने जमा आहे. यात सुमारे ५१२ टन सोने देशातील नागपूर आणि मुंबईच्या आरबीआयच्या तिजोरीत ठेवले आहे. उर्वरित सोने विदेशी बँकांकडे ठेवले आहे. उदा. बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स, भारताचा एकूण विदेशी चलनसाठ्यात सोन्याचा वाटा ११.७ टक्के इतका आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.