AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या शहरात आहे भारताचा सर्वात मोठा मॉल, हा अब्जाधीश आहे मालक, निर्मितीचा खर्च किती ?

या मॉलची खासीयत म्हणजे यातील फूड कोर्टमध्ये अडीच हजार लोक एका वेळी बसू शकतात. येथे साडे तीन हजार वाहने पार्क करता येतात. यात आयमॅक्स मल्टीप्लेक्स थिएटरही आहे.

या शहरात आहे भारताचा सर्वात मोठा मॉल, हा अब्जाधीश आहे मालक, निर्मितीचा खर्च किती ?
| Updated on: Oct 05, 2025 | 6:24 PM
Share

केरळच्या तिरुवनंतपुरम येथे लुलु मॉल हा भारताचा सर्वात मोठा मॉल ( Largest Mall in India ) आहे. जो मॉल 25 लाख चौरस फूटांहून अधिक जागेत पसरलेला आहे यात इंटरनॅशनल आणि देशी ब्रँड्स सह एक मोठे फूड कोर्ट, एक इनडोअर एंटरन्टेमेंट पार्क आणि एक मल्टीप्लेक्स थिएटर देखील आहे. याचे एकूण क्षेत्रपळ 2,111,686 चौरस मीटर आहे. याचे मालक कोण आहेत आणि याच्या निर्मितीसाठी किती कोटी रुपये खर्च आले हे पाहूयात…

कुठे आहे नेमका हा मॉल

लुलु मॉल हा केरळातील तिरुवनंतपुरमच्या अक्कुलम येथे नॅशनल हायवे 66 च्या जवळ 19 एकर जमीनवर उभा आहे. येथे 300 हून अधिक स्टोअर्स आहेत. त्यात लुलु हायपरमार्केट सारखे प्रमुख एंकर स्टोर देखील समाविष्ट आहे. या मॉलमध्ये एक इनडोअर एंटरटेन्मेंट झोन, एक ट्रॅम्पोलिन पार्क, बॉलिंग एली, एडव्हेन्चर झो आणि केरळचा पहिला आयमॅक्स स्क्रीन असलेला 12 – स्क्रीनचा पीव्हीआर सुपरप्लेक्स मल्टीप्लेक्स आहे.

फूड कोर्ट आणि पार्किंग

या मॉलमध्ये 2,500 लोकांना बसण्याची जागा असलेला आणि विभिन्न प्रकारचे फूड ऑप्शन असलेला विशाल फूड कोर्ट देखील आहे. या मॉलमध्ये 3,800 हून अधिक कारना पार्क करता येईल एवढी मोठी मल्टी लेव्हल पार्किंगची जागा देखील येथे आहे.

किती खर्च आला

सुरुवातीला लुलु ग्रुप इंटरनॅशनलने तिरुवनंतपुरमच्या पट्टोममध्ये 500 कोटीच्या एक छोटा मॉल बनवण्याची योजना आखली होती. परंतू नंतर ग्रुपने हायवेच्या किनारी अक्कुलममध्ये 46 एकर जमीन खरेदी केली आणि 2,000 कोटी बजेटचा एक मोठा मॉल बांधण्याची योजना आखली. या मॉलचे बांधकाम ऑगस्ट 2016 रोजी सुरु झाले. परंतू कोविडच्या साथीच्या निर्बंधांमुळे बाधा आली. त्यामुळे या प्रकल्पावर 220 कोटी अतिरिक्त खर्च झाले. त्यामुळे या मॉलला उभारण्यास 2220 कोटी रुपये खर्च झाले.

कोण आहेत मालक

तिरुवनंतपुरम स्थित लुलु मॉल लुलु ग्रुप इंटरनॅशनलचा असून त्याचे संस्थापक आणि मालक आहेत अब्जाधीश व्यापारी एमए युसूफ अली. युसुफ जगातील श्रीमंतांच्या यादीत सामील आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांची संपत्ती 5.7 अब्ज डॉलर आहे. भारतीय चलनात ती 50,500 कोटी रुपये आहे.

युसूप जगातील 698 वे श्रीमंत

लुलु ग्रुप इंटरनॅशनल एक युएई स्थित मल्टी – नॅशनल ग्रुप कंपनी आहे.ही कंपनी हायपरमार्केट आणि रिटेल कंपन्यांची एक चेन ऑपरेट करते. तिचे हेडक्वॉर्टर अबूधाबी, युएई येथे आहे. लुलु ग्रुप इंडियाचे मुख्यालय भारतातील कोच्चीत आहे. याची स्थापना 1989 मध्ये केरळच्या नट्टीकाचे एम.ए.युसूफ अली यांनी केली होती.

Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात.
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?.
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?.
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट.
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती.
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक.
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान.
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका.
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड.
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?.