या राज्यात दसऱ्याच्या सणात मद्यविक्रीचा नवा रेकॉर्ड, ३ दिवसात ७०० कोटीचे मद्य रिचवले
दसऱ्यापूर्वी तेलंगणात दारू विक्रीने सर्व विक्रम मोडले गेले आहेत.२ ऑक्टोबरला ड्राय डे आल्याने त्याच्या आधीच्या तीन दिवसांत ७०० कोटी रुपयांची दारू विकली गेली आहे.

दसऱ्याला सर्वात मोठा सण म्हटला जात असतो. एकीकडे रावणाचे दहन होत असताना तेलंगणा राज्यात मद्याच्या दुकानात जणू रावणांची गर्दी उसळली होती. सणासुदीच्या दिवसात येथे मद्यविक्रीने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आकड्यांवर नजर टाकली असता दसऱ्याच्या ठिक तीन दिवस आधी राज्यातील दुकानातून ७०० कोटी रुपयांची दारुविक्री झाली आहे. हा आकड्याने गेल्या वर्षीचा संपूर्ण दसरा सिझनला मागे टाकले आहे.
२ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि दसरा एकत्र आल्याने ड्राय डेची तजवीज आधीच मद्यप्रेमींनी केली. २ ऑक्टोबरला ड्राय डे असल्याने मद्यप्रेमींनी आधीच दुकानांना रांगा लावून मद्याचा स्टॉक खरेदी करुन ठेवला. त्याचा असा फायदा राज्याच्या तिजोरीला झाला की ३० सप्टेंबर रोजी रेकॉर्ड ब्रेक ३३३ कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. त्यामुळे दसऱ्याची आतीषबाजी मद्याच्या प्याल्यातूनच झाली असे तेलंगना सरकारला वाटले. त्याच्या आधीच्या दोन दिवसांपूर्वी ३६७ कोटींचा मद्यातून महसूल मिळाला आहे. त्यामुळे हे तीन दिवसांची एकूण तिजोरीत ६९७. २३ कोटी रुपयांची भर पडली आहे.
अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना यामुळे धक्का बसला. गेल्यावर्षी २०२४ मध्ये दसऱ्याच्या आठ दिवसात ८५२.३८ कोटीची मद्यविक्री झाली होती. तर या वर्षी केवळ तीनच दिवसात ८२ टक्के लक्ष्य साध्य झाले ! हा परिणाम सणासुदीच्या पार्ट्या, कौटुंबिक मौजमजा आणि रात्री उशीरापर्यंत मित्रांच्या रंगलेल्या मैफिलीमुळे झाल्याचे म्हटले जात आहे. लोकांनी ड्राय डेचा जरा जास्त धसका घेतल्याने आधीच स्टॉक भरुन मद्य रिचववल्याचे उघड झाले आहे.
रेकॉर्ड ब्रेक विक्रीने राज्याला फायदा
या रेकॉर्डब्रेक विक्रीने तेलंगणा राज्याच्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला आहे. तेलंगणात दारुतून होणारी कमाई साल २०१४ मध्ये केवळ १०,००० कोटी रुपये व्हायची. परंतू आता २०२४-२५ मध्ये हा आकडा ३४,६०० कोटींवर पोहचण्याचा अंदाज आहे.दसरा सारखे सणासुदीचे दिवसात मद्याची अशा प्रकारे विक्री झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मद्याचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ यापासून लांबच राहण्याचा सल्ला देत आहेत.
