आज रात्री भयानक घडणार, ट्रम्प यांची मध्यरात्रीच जोरदार हल्ल्याची धमकी; हाहा:कार… जगावर पुन्हा महासंकट

अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी "आज रात्री जोरदार हल्ले करणार" अशी धमकी दिली आहे. इराणची वीज ग्रीड, जल प्रकल्प आणि तेलाचे केंद्र असलेल्या खार्ग आयलँडवरही हल्ल्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी इराणसोबत कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट केले.

आज रात्री भयानक घडणार, ट्रम्प यांची मध्यरात्रीच जोरदार हल्ल्याची धमकी; हाहा:कार... जगावर पुन्हा महासंकट
donald trump
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 09, 2026 | 12:27 AM

अमेरिका आणि इराणमध्ये मध्यंतरी सुसंवाद झाल्याने आता सर्व काही अलबेल होईल असं जगाला वाटलं होतं. इराण आणि अमेरिकेचं पुन्हा युद्ध होणार नाही, असं वाटल्याने जगाने मोकळा श्वास घेतला होता. पण पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. अमेरिकेने काही तासांपूर्वीच इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले चढवले आहेत. तर इराणकडूनही जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. इराणच्या या हल्ल्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चवताळले आहेत. त्यांनी इराणला बेधडक धमकीच दिली आहे. आज रात्री इराणवर जोरदार हल्ले करणार आहोत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प सध्या तुर्कीच्या नाटो समिटमध्ये भाग घेण्यासाठी गेले आहेत. त्यांनी अंकारामध्ये यूक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर जेलन्स्की यांची भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प यांनी इराणच्या विरोधात लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून जगाची झोप उडाली आहे. युद्ध इराण आणि अमेरिकेचं असलं तरी त्यामुळे इतर देश भरडून निघत आहेत.

मी इराणला छोटीशी वॉर्निंग देतोय. आज रात्री आम्ही त्यांच्यावर जोरदार हल्ले करणार आहोत, असं ट्रम्प म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. अमेरिका आणि इराण दरम्यानचं सीजफायर संपलं का? असं विचारल्यावर ट्रम्प म्हणाले, अमेरिकन सैन्याने रात्रभर 28 जहाज उद्ध्वस्त केले आहेत. गरज पडल्यास इराणच्या अजूनही जहाजांना नष्ट केल्या जाईल.

तडजोड नाहीच…

इराणच्या इलेक्ट्रिसिटी ग्रीड आणि वॉटर फॅसिलिटीजलाही आम्ही टार्गेट करू शकतो. होर्मुजमध्ये पुन्हा नाकेबंदी करू शकतो. आम्ही खार्ग आयलँडवरही जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिलाय. खार्ग आयलँडवर इराणच्या तेल निर्मितीचं मुख्य हब आहे. ट्रम्प यांनी इराण सोबत कोणत्याही प्रकारची नवीन डील करायची नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आता इराण सोबतच्या तडजोडीचा काळ संपला आहे. ते रुग्ण लोक आहेत. मला त्यांच्याशी कोणतीच डील करायची नाही. आता इराणसोबत तडजोडी करण्याची वेळ निघून गेलीय, असं त्यांनी सांगितलं.

इराणचे लोक वाईट आहेत. मनोरुग्ण आहे. विक्षिप्त आहेत. अनेक लोक सांगत आहेत की इराणचे लोक बेईमान आहेत. हे लोक डीलवर कायम राहत नाहीत. स्टिव्ह व्हिटकॉफ, जेयर्ड कुश्नर आणि जेडी वेन्स सध्या इराण प्रकरणात व्यस्त आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Follow Us