AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा; म्हणाले, युद्धविराम…

अंकारामध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. "इराण मलाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे" असे ते म्हणाले. तसेच त्यांनी केलेल्या घोषणेने जगभरात खळबळ माजली आहे.

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा; म्हणाले, युद्धविराम...
donald trumpImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 08, 2026 | 3:12 PM
Share

गेल्या कित्येक महिन्यांपासून अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये युद्ध सुरु होते. पण काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. त्यामुळे अमेरिकेने हल्ले थांबवले होते. पण आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणशी झालेला करार संपल्याची घोषणा केली आहे. अंकारामध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रंप यांनी म्हटले की, “इराणशी आता कोणताही करार होणार नाही. आम्ही सर्वकाही संपवले आहे.” ट्रंप यांनी ही घोषणा इराणने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकी ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर काही वेळातच केली.

ट्रंप म्हणाले काय?

राष्ट्राध्यक्ष ट्रंप पुढे म्हणाले की, “इराण माझ्याशी खोटे बोलला. म्हणून आता तेहरानशी पुढील कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही तेहरानला अणु मुक्त बनवणार आहोत. यासाठी लवकरच योजना अमलात आणली जाईल.” इकडे इराणने अमेरिकेला उत्तर देताना म्हटले आहे की, “आम्ही युद्धासाठी तयार आहोत. अमेरिकेने होर्मुजमध्ये विश्वासघात केला आहे. त्यामुळे त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यावर विश्वास ठेवता येत नाही.”

डील संपवण्याबाबत ट्रंप काय म्हणाले?

ट्रंप म्हणाले, “इराणचे लोक कोणालाही सोडत नाहीत. त्यांनी मलाही लक्ष्य केले आहे. ते मला सोडणार नाहीत. ते लोक खूप गलिच्छ आहेत. मी त्यांना सांगितले आहे की, तुम्ही हल्ला केलात तर आम्हीही सोडणार नाही. इराणचे लोक कोणाचेही ऐकत नाहीत.” ट्रंप यांनी नाटो सदस्य देशांवरही टीका केली. ते म्हणाले, “नाटोचे सदस्य दहतवाद्यांशी सुरु असलेल्या लढाईत मला मदत करत नाहीत. मी नाटोबद्दल फारसा समाधानी नाही. तेहरानला मी अणु मुक्त बनवणारच. यासाठी आम्ही काम करत आहोत.”

खामेनेईच्या अंत्ययात्रेत ट्रंपविरोधात घोषणा

तेहरानमध्ये खामेनेई यांच्या अंत्ययात्रेत इराणमधील कट्टरपंथी लोकांनी “ट्रंपची हत्या करा” अशा घोषणा दिल्या होत्या. यावेळी “डेथ टू अमेरिका” अशी घोषणाबाजीही करण्यात आली. शिवाय, इराणच्या विशेषज्ञ परिषदेने एक फतवा जारी करून म्हटले होते की, ट्रंपची हत्या करणे हे सर्व इराणी लोकांसाठी धार्मिक कर्तव्य आहे.

करार का संपवला?

मंगळवार (७ जुलै) रोजी इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डने होर्मुजमध्ये कतार आणि सौदी अरेबियाच्या जहाजांवर हल्ला केला. यामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेने ८ जुलैच्या सकाळी इराणच्या अनेक ठिकाणांवर हल्ला केला. इराणने प्रत्युत्तरादाखल कुवेत आणि बहरीनमध्ये हल्ले केले. अमेरिका यामुळे अत्यंत नाराज आहे. कतारनेही इराणला दोषी ठरवले आहे. कतारचे म्हणणे आहे की, इराणने ६० दिवस कोणत्याही जहाजावर हल्ला न करण्याचे वचन दिले होते, पण त्याने स्वतःच ते वचन मोडले.

Follow Us
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक