तुर्कीने ओकली भारताविरोधात आग, थेट खळबळ, भारत नाराज आहे तर काय करायचे..

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून तणाव आहे. भारत मागील काही दिवसांपासून तुर्कीवरही नाराज आहे. तुर्की चुकीच्या गोष्टींमध्ये पाकिस्तानसोबत उभा असतो. आता तुर्कीने भारताबद्दल अत्यंत मोठे विधान केले.

तुर्कीने ओकली भारताविरोधात आग, थेट खळबळ, भारत नाराज आहे तर काय करायचे..
Turkish Foreign Minister Hakan Fidan
| Updated on: Jun 04, 2026 | 7:45 AM

ऑपरेशन सिंदुरदरम्यान पाकिस्तानला तुर्कीने मदत केली. भारतात हल्ला करण्याकरिता पाकिस्तानने जे ड्रोन वापरली ती ड्रोन तुर्कीने त्यांना पोहोचली होती. पाकिस्तानला कायमच चुकीच्या गोष्टीमध्ये तुर्की मदत करत असल्याने भारत तुर्कीवर नाराज आहे. यादरम्यानच आता तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट भारताबद्दल तळपायाची आग मस्तकाला जाणारे विधान केले. तुर्कीचे म्हणणे आहे की, जगात अजूनही काही असे देश आहेत, ज्यांचे संबंध पाकिस्तानसोबत खूप जास्त चांगले आहेत. IISS च्या कार्यक्रमात तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकन फदान पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी भारतासोबतच्या संबंधांवर भाष्य केले. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले की, भारतासोबत आमचा कोणताही व्दिपक्षीय वाद नाही. आम्हाला वाटते की, आमचे भारतासोबत संबंध चांगले असावेत. मुळात म्हणजे भारतासोबत आमची कोणतीही बॉर्डर नाही.

कोणताही व्दिपक्षीय मुद्दा नाही. भारतासोबत कोणताही वाईट इतिहास नाही. चांगले संबंध ठेवण्याकरिता खूप कारणे आहेत. पण तुर्की हा एकच जगात देश नाही, ज्याचे पाकिस्तानसोबत चांगले संबंध आहेत. काही मुद्द्यामध्ये त्यांच्यासोबत जोडले गेलो आहोत. त्यांनी पुढे म्हटले की, आमचे अमेरिकेसोबत, रशियासोबत काही मुद्द्यात नक्कीच मदतभेद आहेत. पण आम्हाला या गोष्टी विसरून पुढे चांगले संबंध ठेवायचे आहेत.

मला मनातून वाटते की, भारत आणि तुर्कीमध्येही असेच व्हावे. कारण आमच्यामध्ये एकमेकांचे सहकार्य करण्याकरिता खूप काही आहे. एवढी तर समजदारी आहे की, आम्ही चांगल्या दिशेला गेले पाहिजे. मुळात म्हणजे तुर्की हा एकच देश नाही, ज्याचे पाकिस्तानसोबत चांगले संबंध आहेत. असे अजून बरेच देश आहेत. भारत त्याही देशांवर कारवाई करतो का? किंवा नाराज राहतो, ज्याचे पाकिस्तानसोबत चांगले संबंध आहेत.

मी भारताला आवाहन करतो की, आम्हाला त्यांच्याबद्दल व्दिपक्षीय कोणतीही समस्या नाही, त्यांनी या गोष्टीकडे चांगले बघितले पाहिजे. ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव होता. ऑपरेशन सिंदूरमध्ये दोन्ही बाजूंनी हल्ले केले जात होते, त्यावेळी तुर्कीने पाकिस्तानला 350 ड्रोन पाठवली होती. प्रत्यक्षात यादरम्यान तुर्कीने भारताविरोधात पाकिस्तानची मदत करत त्यांना ड्रोन पाठवली होती.

Follow Us