भारताची यूएईसोबत मजबूत भागीदारी, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये सांगितले

टीव्ही९ नेटवर्क दुबईमध्ये दुसऱ्या न्यूज ९ ग्लोबल समिटचे आयोजन करत आहे. आजच्या समिटला भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संबोधित केले.

भारताची यूएईसोबत मजबूत भागीदारी, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये सांगितले
Hardeep Singh Puri
| Updated on: Jun 19, 2025 | 2:07 PM

टीव्ही९ नेटवर्क दुबईमध्ये दुसऱ्या न्यूज ९ ग्लोबल समिटचे आयोजन केले आहे. ही समिट गुरुवारपासून सुरू झाली. राजकारणी, धोरणकर्ते, व्यवसाय आणि तंत्रज्ञान जगातील तज्ज्ञांव्यतिरिक्त, चित्रपट जगतातील सेलिब्रिटी देखील या समिटमध्ये सहभागी होत आहेत. या शिखर परिषदेला भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संबोधित केले. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या ऊर्जेच्या गरजा झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शिखर परिषदेत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

हरदीप सिंग पुरी म्हणाले की, भारत आणि युएईमधील वाढत्या सहकार्य आणि भागीदारीच्या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद खूप महत्त्वाची आहे. दोन्ही देश इतिहास, संस्कृती आणि इतर अनेक कारणांनी एकमेकांशी जोडलेले आहेत. भारत आणि युएईमधील संबंध कच्च्या तेलाच्या किंवा इतर गरजांपेक्षा खूप पुढे गेले आहेत. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीची तीन वर्षे पूर्ण होत आहेत. ही भागीदारी दोन्ही देशांच्या जनतेमध्ये झाली आहे. युएईमध्ये मंदिर बांधले गेले आहे. यूएईच्या धर्मनिरपेक्ष भावनेमुळेच हे शक्य झाले, असे पुरी यांनी सांगितले. यूएईमधील ३५ लाख भारतीय दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्यासाठी महत्वाचा स्तंभ ठरले आहेस असे पुरी यांनी म्हटले.

टीव्ही ९ मराठीचे पहिले ग्लोबल समिट मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये जर्मनीत झाले होते. या वर्षी दुबईत संमेलन होत आहे. संमेलनाचा आज पहिला दिवस आहे. त्याची थीम इंडिया-यूएई पार्टनरशिप फॉर प्रासपिएरिटी अँड प्रोग्रेस अशी ठेवली आहे. दोन्ही देशांतील संबंधांमध्ये ही थीम एक मैलाचा दगड असणार आहे.