
भारतातील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असलेले, न्यूज ब्रॉडकास्टर TV9 नेटवर्क, News9 Global Summit – Germany Edition च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन जर्मनीतील स्टटगार्ट शहरात 9 ते 10 ऑक्टोबर 2025 दरम्यान करण्यात आलं आहे. हे शिखर संमेलन भारत-जर्मनीमधील धोरणात्मक सहकार्याच्या 25 वर्षांचा उत्सव साजरं करत आहे.
समारंभाचे आयोजन : महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या पुढाकाराने, TV9 नेटवर्कने याचे आयोजन केले असून VfB स्टटगार्ट सह-यजमान म्हणून सहभागी आहे. या उपक्रमाला बाडेन-वुर्टेमबर्ग राज्याचे समर्थन लाभले आहे.
थीम कोणती ?
लोकशाही | लोकसंख्याशास्त्र | विकास – भारत-जर्मनी संबंधांचा परिपाठ, या मुख्य विषयाभोवती संवाद आणि सहकार्य घडवणारे हे शिखर संमेलन आहे.
सहभागी संस्थांचा सहभाग :
Gold Partners: Fintiba आणि Barmer
Silver Partners: MHP (A Porsche Company), Tata Ace Pro
Health Partner: TK
Associate Partners: MMRDA, CIDCO, महाराष्ट्र पर्यटन आणि SRA बृहन्मुंबई
Innovation Partner: GIIC
Session Partner: Karlsruhe
Celebration Partner: A Heinrich
प्रारंभाची सुरुवात बर्लिनमधून
6 ऑक्टोबर रोजी AXICA कन्वेन्शन सेंटर, बर्लिन येथे, ब्रँडेनबर्ग गेटजवळ, या शिखर संमेलनाची सुरुवात झाली. भारताचे जर्मनीतील राजदूत एच. ई. अजित गुप्ते यांच्या प्रमुख भाषणाने प्रारंभ झाला. News9 द्वारे आयोजित ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीवर परिसंवाद आणि प्रमुख वक्त्यांचे सत्रही या दरम्यान झाले.
प्रमुख वक्ते आणि प्रतिनिधी
जर्मनी आणि युरोपकडून जोहान डेव्हिड वेडफुल (परराष्ट्र मंत्री), नीना वर्केन (आरोग्य मंत्री), मारोश सेफकोविच (युरोपियन कमिशनर – व्यापार), विनफ्रेड क्रेचमन (बाडेन-वुर्टेमबर्गचे मंत्री अध्यक्ष), निकोल हॉफमेस्टर-क्राऊट (श्रम, अर्थव्यवस्था आणि पर्यटन मंत्री), आणि फ्रँक नॉपर (स्टटगार्टचे महापौर) हे मान्यवर उपस्थित.
उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते : अँड्रियास लॅप, जोआखिम एर्डले (LBBW), बर्न्ड-ओटो हेर्मन (MHP इंडिया), अंजा हेन्डेल (NXTGN), होंझा नगो (Blockbrain), आणि यान-फ्रेडरिक डॅमेनहाईन (Quantum Systems)
तर भारताकडून केंद्रीय उद्योग व व्यापार मंत्री पियूष गोयल (व्हर्च्युअल), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (व्हर्च्युअल), खासदार अनुराग ठाकूर, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मुख्य भाषण झाले.
नीती विश्लेषक व उद्योग दिग्गज : अरविंद वीर्मानी (NITI आयोग), सचिन कुमार शर्मा (RIS), विवेक लाल (General Atomics), पंकज व्यास (Siemens), अनंदी अय्यर (Fraunhofer India), उज्ज्वल ज्योती (Accenture India)
सांस्कृतिक व क्रिएटिव्ह प्रतिनिधी म्हमून प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर, कॅप्टन झोया अग्रवाल, सिद्धार्थ भसीन (GIIC), आणि मार्कस बेश (Impact Hub Karlsruhe) हेही उपस्थित.