Typhoon Imelda : जमिनीच्या दिशेने येतायत 2 मोठी संकटं, सागरात घडतंय काहीतरी अजब!

सध्या एका वादळाचा धोका संपलेला नसता. आता दुसरे वादळही समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने येत आहे. या वादळाचे नाव इमेल्डा असून त्याचा भारतावर परिणाम पडणार का? असे विचारले जात आहे.

Typhoon Imelda : जमिनीच्या दिशेने येतायत 2 मोठी संकटं, सागरात घडतंय काहीतरी अजब!
america typhoon imelda
| Updated on: Sep 28, 2025 | 3:17 PM

Typhoon Imelda : सध्या अटलांटिक महासागरात हम्बर्टो वादळ उठले आहे. या वादळाचा श्रेणी 5 मध्ये ठेवण्यात आले असून या श्रेणीमधील वादळ अत्यंत भीषण समजले जाते. या श्रेणीतील वादळ 225 किमी प्रतितासाच्या वेगाने पुढे सरकरते. या श्रेणीतील वादळ आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकालाच उद्ध्वस्त करून टाकते. या वादळापासून वाचण्यासाठी अमेरिकेचे प्रशासन कामालाल लागलेले आहे. असे असतानाच आता अमेरिकेपुढे आणखी एका वादळाचे संकट निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हे दुसरे वादळदेखील हम्बर्टो वादळाच्याच वाटेने येत आहे.

समुद्रकिनाऱ्याच्या देशेने पुढे सरकत आहे वादळ

मिळालेल्या माहितीनुसार या नव्या वादळाचे नाव इमेल्डा असे आहे. अमेरिकेच्या दक्षिण-पूर्व म्हणजे अग्नेय समुद्रकिनाऱ्याच्या देशेने पुढे सरकत आहे. तज्ज्ञ या वादळाला उष्णकटीबंधीय चक्रीवादळ म्हणत आहेत. हे वादळ कॅरेबियन सागरापासून फ्लोरिडा आणि दक्षिण-पूर्व अमेरिकेसाठी मोठे धोकादायक ठरू शकते.

समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होण्याची शक्यता

सध्या बहामास येथे मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाआ हे. त्यामुळे आगामी 24 तासांत म्हणजेच सोमवारच्या सकाळी अमेरिकेच्या अग्नेय भागात तसेच कॅरेबियन देशांमध्ये पूर, पाऊस, तसेच समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात वादळी वाराही सुटण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय वादळ व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळीच क्यूबा आणि बहमास यांच्या मध्ये 56 कमी प्रतितास या वेगाने वादळी हवा चालू झाली आहे.

इमेल्डा वादळाचा धोका कमी पण…

दुसरीकडे अमेरिकेच्या हवामान विभागाने या आठवड्याच्या शेवटी इमेल्डा नावाचे हे वादळ बहमास या भागात वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण कॅरोलिनाच्या समुद्रकिनाऱ्यावर येईपर्यंत या वादळाचा वेग कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या वादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. मात्र भविष्यात हे इमेल्डा वादळ जमिनीपर्यंत येणार नसले तरी यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यावरील भागात पुराची शक्यता आहे. त्यामुळे सध्या अमेरिकेतील आपत्कालीन यंत्रणा कामाला लागली. दुसरीकडे या वादळाचा भारतावर काही परिणाम पडणार का? असेही विचारले जात आहे. मात्र भारताचा या वादाळाला धोका नाही. त्यामुळे चिंतेचे कारण नसल्याचे सांगितले जात आहे.