काहीही घडू शकतं… पत्रकार बनणार या देशाचा राजा; 27 वर्ष अँकरिंग, आता…
आफ्रिकेतील युगांडा देशात एक अनोखी घटना घडली आहे, जिथे 27 वर्ष पत्रकारिता करणारे एडवर्ड रुकिडी किजानांगोमा न्याबोंगो तोरो किंगडमचे नवीन राजा बनणार आहेत. मागील राजा, जगातील सर्वात तरुण शासक, किंग ओयो यांच्या निधनानंतर गादीच्या वारसावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता थेट पत्रकारच राजगादीवर बसणार आहे.

जगातील असा एक देश आहे, जिथे एक पत्रकार राजा बनणार आहे. कालपर्यंत जी व्यक्ती न्यूज चॅनलवर बसून अँकरिंग करत होती, आता तिच व्यक्ती देशाच्या शाही गादीवर बसणार आहे. आफ्रिकेतील युगांडा या देशात ही अनोखी घटना घडणार आहे. युगांडातील टूरो नावाच्या किंगडममध्ये उत्तराधिकाऱ्यावरून कलह झाला होता. त्यानंतर पत्रकार प्रिन्स एडवर्ड रुकिडी किजानांगोमा न्याबोंगो राजा बनणार आहे. विशेष म्हणजे तो ज्या राजाची गादी सांभाळणार आहे, तो राजा आधी जगातील सर्वात तरुण शासक होता. त्या राजाने वयाच्या तिसऱ्या वर्षीच गादी सांभाळली होती. मात्र वयाच्या 34 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्याने या किंगडमला नवीन राजा मिळाला आहे.
युगांडा हे एक गणतंत्र आहे. या देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते. पण पारंपारिक राजेशाहीलाही मान्यता देण्यात आलेली आहे. युगांडाचे शासक हे सांस्कृतिक भूमिका निभावत असतात. प्रिन्स एडवर्ड रुकिडी किजानांगोमा न्याबोंगो द्वितीय यांना टुरोची राजगादी मिळाली असून त्यांनी नेतृत्व स्वीकारलं आहे. सांस्कृतिक संस्था म्हणून काम करणाऱ्या चार ऐतिहासिक राज्यांपैकी यूगांडा हे एक आहे. या राज्यांकडे मर्यादित राजकीय ताकद आहे.
राजाच्या मृत्यूनंतर वाद
किंग ओयो न्यिम्बा कबांबा इगुरू रुकिडी IV यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांनी 1995 मध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी राजगादीची सूत्रे हाती घेतली होती. मात्र, कॅन्सरमुळे त्यांचं वयाच्या 34 व्या वर्षी निधन झालं. गादीवर बसल्यावर त्यांची जगातील सर्वात कमी वयाचा राजा म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. मात्र, ओयो यांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारीवरून वाद निर्माण झाला. ओयो यांच्या मुलालाच राजा बनवावं, असं ओयो यांच्या आईे मागणी केली होती. पण ओयो यांच्या मुलाबाबत कुटुंबा व्यतिरिक्त कुणाला काहीच माहीत नाही. कुणीही त्याला ओळखत नाही. तसेच, उत्तराधिकाऱ्याचा वाद झाल्यानंतर आम्हाला नजरकैदेत ठेवल्याचा दावाही ओयो यांच्या आईने केला होता.
शेवटी बाबीटो शाही घराण्याच्या एका निवड समितीने राजाच्या आईचं म्हणणं ऐकलं आणि दिवंगत राजाचा चुलत भाऊ प्रिन्स एडवर्डला राजा बनवण्याचा निर्णय घेतला. न्यूज एजन्सी एएफपीच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी राज्याभिषेक होणार आहे. त्यासाठी आतापासूनच टुरोमध्ये जल्लोष सुरू झाला आहे.