AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे बंधूंचा मोर्चा… देवेंद्र फडणवीस यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले, त्यांना…

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंच्या मोर्चावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला तरी मुद्द्यांची सत्यता तपासा. तसेच, महाराष्ट्रातील अग्निवीरांना कोणतीही परीक्षा-ट्रेनिंगविना थेट शासकीय सेवेत सामावून घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

ठाकरे बंधूंचा मोर्चा... देवेंद्र फडणवीस यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले, त्यांना...
cm devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 3:06 PM
Share

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्याच्या विरोधात येत्या 4 ऑक्टोबर रोजी ठाकरे बंधूंनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत हे आंदोलन होणार असून स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. फक्त आपण जे मुद्दे मांडत आहोत, ते किती खरे आहेत, हे एकदा तपासून पाहिलं पाहिजे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना लगावला आहे.

लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. कोण आंदोलन करत आहे, त्यावर टीका करणार नाही. ज्या मुद्द्यांवर आंदोलन करतो तो किती खरा आहे हे समजून घ्या. आपण जे उदाहरणं देतो. तेही समजून घ्या, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

त्यांना फायदा देणार

मुंबईत आज उपवर्गीकरणाच्या समर्थनासाठी मातंग समाजाने मोर्चा काढला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने रिपोर्ट दिला आहे. त्यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. विविध समाजाचे प्रतिनिधी मला भेटले होते, त्यांनी त्यांचे काही मुद्दे मांडले आहेत. या अर्जांचा विचार करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती केली आहे. कोणतीही कार्यवाही करताना जाती जातीत तेढ निर्माण होणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत. ज्या लोकांना आरक्षणाचा फायदा मिळाला नाही त्यांना फायदा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

ना परीक्षा, ना ट्रेनिंग

यावेळी त्यांनी अग्नीवीरांना महाराष्ट्रातील शासकीय सेवेत सामावून घेणार असल्याचं स्पष्ट केलं. अग्नीविरांच्या पहिल्या बॅचचा कार्यकाळ संपत आहे. महाराष्ट्रातील अग्नीवीर परत येणार आहेत. अग्नीवीरांसाठी केंद्राने एक निर्णय घेतला होता. 25 टक्के अग्नीवर हे सैन्यात राहतील. 75 टक्के अग्नीवीर हे केंद्र आणि राज्याच्या विविध फोर्सेसमध्ये घेतले जातील. पोलीस किंवा तत्सम पदं आहेत. त्या सर्व पदांवर या अग्नीवीरांना सामावून घेणार आहोत. त्यांच्यासाठी कोणतीही परीक्षेची अट नाही. ट्रेनिंगची अट राहणार नाही. ते परीक्षा आणि ट्रेनिंग देऊन आले आहेत. यंग आहेत. तरीही चार वर्षाची सूट वयात देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

अग्नीवीर फायरमन म्हणून गेले तर त्यांना तीन महिन्याचं ट्रेनिंग एका वर्षात घ्यावं हे बंधन असणार आहे. पदं कमी पडले तर अधिसंख्य पदं निर्माण करणार आहोत. जेवढे अग्नीवीर येतील त्यांना सरकारी सेवेत सामावून घेणार आहोत. नेव्हीतील अग्नीवीरांना कोस्टल सेक्युरिटीत घेणार आहोत. अग्नीवीरांना 10 टक्क्यांचं आरक्षण दिलं आहे. माजी सैनिक कॅटेगिरीत पदं रिक्त राहतात. त्यावरही त्यांना घेणार आहोत. ज्या ज्या लोकांना शासनात काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्या अनुभवांचा फायदा करून घेणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल उभारला
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा...
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा म्हणाल्या...
IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली...
Divya Mittal : IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली त्या शाळेची कहाणी, व्यवस्थेतून प्रश्न सुटत नसतील तर...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊत...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊतांना दिलं उत्तर
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं...
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं का म्हणाला?
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण