AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बैठकी आधीच इंडिया आघाडीत मोठी फूट? डीएमके आणि आपचा वेगळा निर्णय? अखिलेश यादव…?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित घोटाळ्यांवर चर्चा करण्यासाठी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत फूट पडल्याचे समोर आले आहे. डीएमके, आप आणि अखिलेश यादव स्वतः या बैठकीला गैरहजर राहणार आहेत.

बैठकी आधीच इंडिया आघाडीत मोठी फूट? डीएमके आणि आपचा वेगळा निर्णय? अखिलेश यादव...?
arvind kejriwalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 2:38 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्यांच्या विरोधात इंडिया आघाडीची बैठक होत आहे. उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्येही बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची रणनीती ठरवली जाणार आहे. तसेच या बैठकीत विरोधक आपली एकजूटता दाखवणार आहेत. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा या बैठकीला स्वत: उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बैठकीपूर्वीच इंडिया आघाडीत फूट पडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या बैठकीला डीएमकेच प्रमुख एमके स्टालिन आणि अरविंद केजरीवाल यांचे प्रतिनिधी सामील होणार नाहीत, अशी सूत्रांनी माहिती दिली. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर डीएमके आणि काँग्रेसमध्ये खटके उडत आहेत. तेव्हापासूनच डीएमकेने काँग्रेसपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

दुसरीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि आम आदमी पार्टीत चांगलाच तणाव निर्माण झाला होता. ज्या ठिकाणी काँग्रेस असेल तिथे आम्ही जाणार नाही, असं आपकडून वारंवार सांगण्यात आलं आहे. मात्र, डीएमके आणि आम आदमी पार्टी दोन्हीही पक्ष एसआयआरच्या मुद्द्यावरून आक्रमक आहेत. दोन्ही पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अखिलेश यादव नाही जाणार

दरम्यान, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादवही उद्याच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाहीत. मात्र, त्यांचे प्रतिनिधी या बैठकीत सामील होणार आहेत. तर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा बैठकीला हजर राहणार नाहीत. मात्र, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्धव ठाकरे या बैठकीला हजेरी लावणार आहेत.

मी बैठकीला जात आहे

दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ममता बॅनर्जी या निघाल्या आहेत. त्या कोलकात्याहून दिल्लीकडे रवाना झाल्या. यावेळी त्यांनी एअरपोर्टवर मीडियाशी संवाद साधला. निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यावर इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीत सामील होण्यासाठी मी दिल्लीला जात आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

बातमी आली आणि…

23 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोग आणि एसआयआरबाबत इंडियन एक्सप्रेसमध्ये मोठा खुलासा झाला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती. त्यानुसार उद्या बैठक होत आहे. या बैठकीत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशव्यापी आंदोलन छेडण्यावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Follow Us
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा...
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा म्हणाल्या...
IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली...
Divya Mittal : IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली त्या शाळेची कहाणी, व्यवस्थेतून प्रश्न सुटत नसतील तर...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊत...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊतांना दिलं उत्तर
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं...
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं का म्हणाला?
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू