नेपाळ आणि फ्रान्सनंतर या देशात मोठा हिंसाचार, लाखो लोक रस्त्यावर, डोके आणि नाक फोडले, दातही…

UK protest : नुकताच नेपाळमध्ये मोठा हिंसाचार बघायला मिळाले. निदर्शकांनी थेट संसदेला देखील सोडले नाही. सरकारी कार्यालयांसह न्यालपालिकेला देखील आग लावली. नेपाळमधील हिंसाचारानंतर अजून एका देशामध्ये अस्थिरता बघायला मिळतंय.

नेपाळ आणि फ्रान्सनंतर या देशात मोठा हिंसाचार, लाखो लोक रस्त्यावर, डोके आणि नाक फोडले, दातही...
UK protest
| Updated on: Sep 14, 2025 | 10:24 AM

नेपाळ आणि फ्रान्समध्ये काही दिवसांपूर्वीच मोठी राजकीय उलथापालथ झाली. नेपाळमधील स्थिती अत्यंत गंभीर बनली. थेट सोशल मीडियावर बंदी घातल्याने तरूण रस्त्यावर उतरले. फक्त रस्त्यावर उतरले नाही तर त्यांनी संसद, प्रधानमंत्री कार्यालय, न्यायपालिका पेटवली. शेवटी लष्कराने सूत्रे हातात घेतली. यादरम्यान अनेक मंत्र्यांच्या घराला थेट आंदोलकांनी आग लावली. काही मंत्री नेपाळ सोडून चक्क विदेशात पळून गेले. फ्रान्समध्ये धक्कादायक गोष्टी घडताना दिसल्या. नेपाळमधील परिस्थितीमध्ये भारताने सीमा भागातील सुरक्षा चांगलीच वाढवल्याचे बघायला मिळाले. नेपाळ तीन दिवस पेटत होता.

आता नेपाळ आणि फ्रान्सनंतर थेट इंग्लंडमध्ये उद्रेक बघायला मिळतोय. शनिवारी 13 सप्टेंबर रोजी ब्रिटिश कट्टरपंथी नेते टॉमी रॉबिन्सन यांनी आयोजित केलेल्या ‘युनाईट द किंगडम’ मोर्चात 1,00,000 हून अधिक लोक सहभागी झाले. यादरम्यान परिस्थिती इतकी जास्त चिघळली की, रॉबिन्सन यांच्या समर्थकांमध्ये आणि पोलिसांमध्ये थेट झटापट झाली आणि या मोर्चाला हिंसक वळण लागले. यादरम्यान पोलिसांच्या अंगावर बाटल्या फेकण्यात आल्या.

आंदोलकांनी यावेळी पोलिसांना टार्गेट करत काही अधिकाऱ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. परिस्थिती बिकट झाल्यावर दंगलविरोधी पथक तैनात करण्यात आले. आंदोलकांनी केलेल्या मारहाणीमध्ये काही पोलिस गंभीर जखमी झाल्याचेही माहिती मिळतंय. कोणाचे नाक तुटले, कोणाचे डोके फुटले, कोणाचे दात तुटले तर काहींना हातापायांना मोठी दुखापत झाली. या रॅलीला 1,10,000 ते 1,50,000 लोक उपस्थित होते. यादरम्यान लोकांनी जोरदार घोषणाबाजी  केली.

रॉबिन्सन हे इंग्लिश डिफेन्स लीगचे संस्थापक आहेत आणि त्यांना ब्रिटनमधील सर्वात मोठ्या व्यक्तींपैकी एक मानले जाते. त्यांच्या समर्थकांनी स्टॉप द बोट्स, सेन्ड देम होम आणि वी वांट आवर कंट्री बॅक अशा घोषणा दिल्या. यामुळे आता नेपाळ आणि फ्रान्सनंतर लंडनमध्येही परिस्थिती चिघळताना दिसत आहे. आता सरकार याविरोधात काय निर्णय घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण एकदाच इतकी लोक रस्त्यावर उतरल्याने आणि त्यामध्ये हिंसा झाल्याने हा मोठा चिंतेचा विषय लंडनसाठी ठरलाय.