Nepal Gen Z protest : नेपाळमध्ये सोशल मीडियावर का बंदी? सरकारविरोधात Gen-Z का झाले आक्रमक?
Nepal Gen Z protest: नेपाळमधील परिस्थितीने सर्वांनाच विचारात पाडलं आहे. नेपाळमध्ये 'जेन झी' वर्ग इतका आक्रमक का झाला आहे, नेपाळमधील अशांततेची कारणं काय आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घ्या..

Nepal Gen Z protest update: भारताचा शेजारील देश नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठा संघर्ष सुरू आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या दडपशाही कारवायांमुळे संतप्त झालेल्या ‘जेन झी’ वर्गाने तिथे मोठं जनआंदोलन केलं. सरकारच्या धोरणांना विरोध करत नेपाळमध्ये मंगळवारपासून आंदोलन सुरू झालं. पार्लमेंटसह सरकारी इमारतींना आगी लावत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 19 तरुण निदर्शकांचा मृत्यू झाला. देशातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला, तर राष्ट्रपती रामचंद्र पौडेल लष्कराच्या संरक्षणात अज्ञात ठिकाणी गेले. काठमांडू आणि नेपाळमधल्या इतर काही शहरांच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या ‘जेन झी’ निदर्शकांनी अनेक मंत्री आणि राजकारण्यांना लक्ष्य केलं. के. पी. शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना लष्करी हेलिकॉप्टरने वाचवण्यात आलं. त्यानंतर लष्कराने सत्ता हाती घेतली असून तिथे कायदा-सुव्यवस्था पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचालींनी जोर धरला आहे. मात्र या सरकारचं नेतृत्त्व कोणी करावं याबाबत एकमत नाही. ...
