
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चांगलेच पेटल्याचे बघायला मिळतंय. या युद्धामध्ये जग दोन भागांमध्ये विभागल्याचे बघायला मिळतंय. युक्रेनला अमेरिका मदत करत असल्याने हे युद्ध इतक्या काळ चालत असल्याचे जगजाहीर आहे. हेच नाही तर या युद्धात नाटो देशांनीही उडी घेतली. रशियाने म्हटले की, आम्ही फक्त एकट्या युक्रेनसोबत युद्ध लढत नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध लढत आहोत. यासोबतच थेट मोठी धमकी अमेरिकेला रशियाने आता दिलीये. काल रात्री उशिरा युक्रेनने मोठा हल्ला रशियावर चढवला. युक्रेनच्या सशस्त्र दलांनी गेल्या 24 तासांत रशियाच्या सीमावर्ती बेल्गोरोड भागात तब्बल 110 हून अधिक प्राणघातक ड्रोन सोडले आणि मोठा हल्ला केला. यामध्ये मोठे नुकसान रशियाचे झाले असून ती नागरिकांचे जीव गेले. यामुळे एका लहान मुलाचाही समावेश असल्याचे सांगण्यात आलंय.
शेबेकिन्स्की येथील मास्लोवा प्रिस्तान वस्तीवर गोळीबार करण्यात आला. राज्यपाल व्याचेस्लाव ग्लाडकोव्ह यांनी सांगितले की, ग्रॅव्होरोन्स्की जिल्ह्यातील निवासी भागांवर 16 ड्रोन हल्ले आणि गोळीबार करण्यात आला. मोश्चेनॉय गावात एका ट्रकवरील ड्रोन हल्ल्यात एका मुलासह सहा जण जखमी झाले आहेत. सध्या हल्ल्यानंतर जखमी झालेल्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांना टार्गेट करून युक्रेनकडून ड्रोन हल्ले करण्यात आली.
ग्लॅडकोव्ह म्हणाले की, या प्रदेशातील इतर अनेक ठिकाणी युक्रेनियन ड्रोनने हल्ला केला, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. एका घराला देखील टार्गेट करण्यात आले. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया युक्रेन युद्धाची सुरूवात झाली. जवळपास अडी वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. आता हे युद्ध अधिकच पेटताना दिसत आहे. काही देशांनी थेट या युद्धात उतरण्याचा निर्णय घेतलाय. नाटो देश थेट युक्रेनचे समर्थन करताना दिसत आहेत.
आता युक्रेनने रशियावर केलेल्या या भयंकर हल्ल्यानंतर अमेरिका काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. शिवाय अमेरिकेने युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यामधून काहीही मार्ग निघू शकला नाही. अमेरिका रशियावर दबाव टाकण्याचे काम करत आहे. मात्र, अमेरिकेला जोरदार उत्तर रशियाकडून देण्यात आले आहे. त्यामध्येच हा मोठा हल्ला करण्यात आला. युक्रेनच्या हल्ल्याचे जोरदार उत्तर रशिया देणार हे स्पष्टच आहे.