जग हादरलं! रशियाची ट्रम्प यांना खळबळ उडवून देणारी धमकी, अमेरिकेने एक चूक केली तर…
रशियाने अमेरिकेला थेट धमकीच दिली आहे. या धमकीमुळे आता जगाचे टेन्शन वाढले आहे. दुसरीकडे रशियाच्या या पवित्र्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नेमके काय प्रत्युत्तर देणार? याकडेही आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Russia Warns America : सध्या रशियाचे युक्रेनसोबत युद्ध चालू आहे. याच युद्धामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाच आता रशियाने अणुचाचणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांना मोठा इशारा दिला आहे. रशियाचा हा इशारा थेट अमेरिकेला असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आता रशियाच्या या इशाऱ्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
चुकीचा आणि अस्थिरता पसरवणारा निर्णय घेतल्यास…
सध्या संपूर्ण जगात अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा स्थितीत रशियाने अणुचाचणी करणाऱ्या राष्ट्रांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई रयाबकोव यांनीच थेट हा इशारा दिल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. कोणताही देश अणुचाचणी करण्याच्या माध्यमातून चुकीचा आणि अस्थिरता पसरवणारा निर्णय घेत असेल तर आम्ही त्याला थेट प्रत्युत्तर देऊ, असे सर्गेई यांनी म्हटले आहे.
तर रशियादेखील अणुचाणी करणार
सर्गेई यांनी आपल्या विधानातून थेट अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिका हा देश अणुचाचमी करण्यासाठी नेहमीच तयारीत असतो. अणुचाचणी करण्यासाठी अमेरिका पायाभूत सुविधा तयार करत आहे, असे आमच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे अमेरिकेने अशा प्रकारची अणुचाचणी केली तर रशियादेखील अमेरिकेचे अनुसरण करेल. रशियाही अणुचाचणी करेल असा इशारा सर्गेई यांनी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष
दरम्यान, रशियाच्या या उघड धमकीचे पडसाद आता जागतिक राजकारणात उमटू शकतात. युक्रेन युद्धामुळे अगोदरच रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेलेले आहेत. भारत तसेच इतर देशांनी रशियासोबतचा व्यापार थांबवावा अशी अमेरिकेची इच्छा आहे. त्यासाठी अमेरिकेकडून रशियासह इतर काही देशांवर वेगवेगळे निर्बंध लादले जात आहेत. असे असताना आता रशियाने अमेरिकेला थेट धमकीच दिली आहे. रशियाच्या या भूमिकेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
