
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील तणाव वाढताना दिसतोय. अमेरिकेने रशिया युक्रेन युद्धाच्या शांतता करार रशिया आणि युकेनला पाठवला. हा करार रशियाने लगेचच मान्य केला. मात्र, युक्रेनने तो मान्य करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. युक्रेनने करार शांतता करार मान्य करण्यास नकार दिल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले. युक्रेन कोणापुढेही झुकणार नसल्याची त्यांनी भूमिका घेतली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नाव न घेता वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टीकेनंतर वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे बघायला मिळतंय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टनंतर वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, जॅव्हलिन क्षेपणास्त्रांपासून सुरुवात करून आणि आजही सुरू असलेल्या युक्रेनियन लोकांचे जीव वाचवणाऱ्या मदतीबद्दल युक्रेन खरोखरच मनापासून अमेरिकेचे आणि प्रत्येक अमेरिकन हृदयाचे आणि वैयक्तिकरित्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभारी आहे…
कालपर्यंत अमेरिकेच्या शांतता प्रस्तावाला नकार देऊन डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरत नसल्याची भूमिका घेणारे वोलोदिमिर झेलेन्स्की यांची अचानक भूमिका बदलल्याने संशय व्यक्त केला जात आहे. रशियासोबतच्या युद्धात युक्रेनला मोठा सपोर्ट अमेरिकेने केला आहे. नुकताच त्यांनी अमेरिकेकडे घातक क्षेपणास्त्रांची मागणी केली. मात्र, अमेरिकेला आता हे युद्ध थांबवायचे असल्याने त्यांनी सध्याचे युक्रेनने मागितलेली क्षेपणास्त्र देण्यास मनाई केली.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच भडकल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. हेच नाही तर रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांवर मोठा टॅरिफ लावताना डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. त्यांनी रशियाला अडचणीत आणण्यासाठी रशियन तेल कंपन्यांवर जगात बंदी घातली आहे. हेच नाही तर रशियासोबत व्यापार बंद करण्यासाठी अनेक देशांवर दबाव टाकण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे.