काय ब्राह्मोसची कॉपी आहे ओरेश्निक क्षेपणास्त्र? रशियाने युक्रेन हल्ल्यात का वापरली ही मिसाइल?
ऑरश्निक आवाजाच्या वेगापेक्षा 11 पट जास्त वेगाने जाणारे क्षेपणास्त्र आहे. काही विशेषज्ञ म्हणतात, हे क्षेपणास्त्र ब्राह्मोसप्रमाणे क्रूझ नाही तर बॅलिस्टिक प्रकारचे आहे. अनेक जण ऑरश्निकला ब्राह्मोसची कॉपी म्हणतात. परंतु दोघांमध्ये खूप फरक आहे.

युक्रेनने केलेल्या हल्ल्यास रशियाने जोरदार उत्तर दिले. रशियाने पाच जून रोजी ओरेश्निक नावाच्या इंटरमीडियट रेंजच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला. राशियाची ही सर्वात प्रगत हायपरसोनिक मिसाइल आहे. या क्षेपणास्त्रास भारत आणि रशियाने संयुक्तरित्या बनवलेल्या ब्राह्मोस मिसाइलची कॉपी म्हटले जात आहे. कारण प्रचंड वेगाने जाणारे हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र किती खास आहे? या क्षेपणास्त्राची किंमत किती? काय ही ब्राह्मोसची कॉपी आहे? जाणून घेऊ या…
पहिल्यांदा युक्रेनविरोधातच वापर
ओरेश्निक एक हायपरसोनिक इंटरमीडिएट रेंजचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. रशियाने 21 नोव्हेंबर 2024 रोजी पहिल्यांदा त्याचा वापर युक्रेनविरोधात केला होता. युक्रेनच्या ड्निप्रो येथील संरक्षण उत्पादन कारखान्यावर हे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. रशियाचा दावा आहे की, हे क्षेपणास्त्र युरोप राष्ट्रांच्या एअर डिफेन्स प्रणालीला भेदू शकतो. या क्षेपणास्त्राचा वेग एका तासात 12,300 किमी आहे. आवाजाच्या वेगापेक्षा 11 पट जास्त वेगाने हे क्षेपणास्त्र जाते. काही विशेषज्ञ म्हणतात, हे क्षेपणास्त्र ब्राह्मोसप्रमाणे क्रूझ नाही तर बॅलिस्टिक प्रकारचे आहे. दोघांचे तंत्रज्ञान आणि आरखड्यात बदल आहे.
रशिया महिन्याला किती ओरेश्निक बनवते?
रशियाने युक्रेनच्या ड्निप्रो शहरावर ओरेश्निक क्षेपणास्त्राचा 21 नोव्हेंबर 2024 रोजी प्रथम वापर केला होता. युक्रेनकडून करण्यात आलेल्या ATACMS आणि स्टॉर्म शैडो क्षेपणास्त्र हल्ल्यास उत्तर म्हणून ओरेश्निक क्षेपणास्त्र वापरण्यात आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पश्चिमी राष्ट्रांच्या शस्त्रांच्या विरोधात “हाय-टेक उत्तर” असल्याचे म्हटले.
व्लादिमीर पुतिन यांनी डिसेंबर 2024 मध्ये मोठ्या प्रमाणावर ओरेश्निक क्षेपणास्त्राचे उत्पादन करण्याची घोषणा केली. रशियाच्या एका अभियंत्याने म्हटले की, रशिया दर महिन्याला 25 ओरेश्निक बनवू शकतो. 5,000-5,500 किमीपर्यंत या क्षेपणास्त्राचा टप्पा आहे. युरोप आणि युक्रेनचा बहुतांस भागापर्यंत हे क्षेपणास्त्र पोहचू शकतो. 4,000 डिग्री सेल्सियसपर्यंतचे तापमान हे सहन करु शकतो. अनेक जण ऑरश्निकला ब्राह्मोसची कॉपी म्हणतात. परंतु दोघांमध्ये खूप फरक आहे.
