रशियाने उडवली जगाची झोप, वाकड्या नजरेने बघणाऱ्या अमेरिकेला थेट सर्वात धोकादायक अणु क्षेपणास्त्रच..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोणतीही गोष्ट स्वत:च्या फायद्याशिवाय करत नाहीत हे संपूर्ण जगाने बघितले आहे. रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये, याकरिता डोनाल्ड ट्रम्प मोठा खटाटोप करताना दिसत आहेत. यासोबतच त्यांनी रशियाला थेट धमकी दिली. काही दिवसांपूर्वीच भारत, रशिया आणि चीन एकाच मंचावर आले.

रशियाने उडवली जगाची झोप, वाकड्या नजरेने बघणाऱ्या अमेरिकेला थेट सर्वात धोकादायक अणु क्षेपणास्त्रच..
Donald Trump
| Updated on: Sep 13, 2025 | 8:11 PM

रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट सुरू असल्याचे बघायला मिळतंय. रशियाने हे युद्ध थांबवावे, याकरिता भारतासह अनेक देशांवर दबाव टाकण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भेट झाली. डोनाल्ड ट्रम्प यांना काहीही करून रशियाच्या अर्थव्यवस्था डबघाईला आणायची. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला मोठा इशारा दिला. रशियाकडून अमेरिकेच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही इशारा गांर्भियाने घेतले जात नाही. उलट जोरदार उत्तरे दिली जात आहेत. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. भारताने शेवटपर्यंत अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत.

आता रशियसोबत पंगा घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा इंगा पुतिन यांनी दाखवलाय. रशियाने जगातील सर्वात घातक हत्यार बनवले आहे. याचे नाव ऐकूनच दुश्मन देशांची झोप उडालीये. आता रशियाकडे अमेरिका ही तिडक्या नजरेने बघू देखील शकणार नाहीये. रशियाने तयार केलेल्या या खतरनाक हत्याराचे नाव बुरेवेस्तनिक आहे. ज्याला नाटो देश हे स्काईफॉल देखील म्हणतात.

हे एक क्रूझ मिसाईल आहे. हे घातक हत्यार परमाणू उर्जेवर चालते. विशेष म्हणजे हे आरामात परमाणू शस्त्र घेऊन जाऊ शकते. पुतिन यांनी याला अजेय म्हटले आहे. रिपोर्टनुासर, बुरेवेस्तनिक हे क्रूझ मिसाईल आहे. विशेष म्हणजे ते दुसऱ्या मिसाईलपेक्षा फार जास्त वेगळे आहे. या मिसाईलची सर्वात खास बाब म्हणजे याची अनलिमिटेड रेंज आहे. दुसरे मिसाईल ईंधन संपल्यानंतर थांबते. मात्र, हे परमाणू उर्जेवर चालते. यामुळेच हे कितीतरी महिने देखील उडू शकते. याच्या रेंजमध्ये संपूर्ण जग आहे.

या मिझाईलचे अनेक मोठे वैशिष्ट आहे. जगातील सर्वात जास्त घातक हे मिसाईल आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिका युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियाला टार्गेट करताना दिसत आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धात दुसऱ्या कोणत्याही देशाचा हस्तक्षेप चालणार नसल्याचे पुतिन यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे.