मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांची थेट अर्थव्यवस्थेला धक्का देणारी धमकी, नाटोला पत्र लिहित..
डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय निर्णय घेतली हे सांगणे कठीण आहे. आता परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी धमकी देत थेट 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिलीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलाय. भारतावर अमेरिकेकडून दबाव टाकण्याचे काम सुरू आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा हा सध्या चांगलाच चढल्याचे बघायला मिळतंय. रशियाकडून तेल खरेदी करणारे देश हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर असल्याचे बघायला मिळत आहे. आता भारतानंतर अजून एका मोठ्या देशाला डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट धमकी दिलीये. हेच नाही तर त्यांनी 100 टक्के टॅरिफ लावला जाईल, असे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या या धमकीनंतर वाद अधिकच वाढण्याची दाट शक्यता आहे. यावेळी त्यांनी भारताचा उल्लेख केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाबाबतही मोठे विधान केले. थेट नाटोला त्यांनी चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचे आवाहन केले. याबाबतचे त्यांनी थेट पत्रच नाटोला लिहिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, निर्बंधांसोबतच नाटोने चीनवर 50 ते 100 टक्के शुल्क लादले पाहिजे. हा टॅरिफ आणि निर्बंध युक्रेन आणि रशियाचे युद्ध जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत लावावे. चीनने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले तर त्याचा थेट परिणाम हा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, जेव्हा सर्व नाटो देश सहमत होतील आणि ते करायला सुरुवात करतील तेव्हा सर्व नाटो देश रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवतील.
रशियावर कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्बंध लादणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. युद्ध संपवण्याच्या दिशेने पाऊले उचलण्यात आली नाहीत तर रशियावर निर्बंध लादले जातील. यासोबतच त्यांच्याकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर जसे की, चीन आणि भारत यांच्यावरही निर्बध लादून 100 टक्के टॅरिफ लादला गेला पाहिजे. असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच पुतिन यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीतून काहीच निर्णय होऊ शकला नाही. हेच नाही तर उलट डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पुतिन हे चीनच्या दाैऱ्यावर गेले आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. दोन ते तीन दिवसांपूर्वीच रशियाने मोठा हल्ला हा युक्रेनवर केला. हे एकप्रकारे अमेरिकेला मोठे उत्तरच त्यांनी दिले.
