AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं, ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींनी घेतला खतरनाक निर्णय, अणुऊर्जा प्रकल्पावर थेट हल्ला

संपूर्ण जग संकटात असल्याचे सध्या बघायला मिळतंय. युक्रेन आणि रशियाचे युद्ध अधिक तीव्र होताना दिसत आहे. आता युक्रेनने थेट रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पांना टार्गेट केले. शिवाय जेलेंस्की यांचे भाषण ऐकून जगात खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.

जग हादरलं, 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी घेतला खतरनाक निर्णय, अणुऊर्जा प्रकल्पावर थेट हल्ला
war
| Updated on: Aug 25, 2025 | 9:45 AM
Share

भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावला आहे आणि सातत्याने भारताला टॅरिफच्या मुद्द्यावरून धमकावले जात आहे. दुसरीकडे आता जगामध्ये खळबळ उडाली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्की यांनी मोठा इशारा दिला आहे. जेलेंस्की यांनी म्हटले की, जोपर्यंत खरी न्यापूर्ण शांती मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार आहे. आपले भविष्य आपण स्वत: ठरवणार आहोत तर दुसरे कोणीही नाही. जेलेंस्की यांनी थेट जगाला हा इशारा देत रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करत थेट हल्ला केला. त्यांनी म्हटले की, या युद्धाने युक्रेन तुटला नाही तर अजून जास्त मजबूत झाला आहे.

आपला रस्ता अवघड आहे पण हार मानली नाही. पुढील काळात हे युद्ध अधिक तीव्र होणार असल्याचे थेट त्यांनी संकेत दिले आहेत. युक्रेनने रशियाच्या अणुऊर्जा यंत्रणांना आता टार्गेट केल्याचे दिसत आहे. युक्रेनने केलेल्या रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याच्या बातमीने जगभरात चिंता पसरली. आता रशियाकडून जोरदार प्रतिउत्तर युक्रेनला दिले जाणार असल्याचे सांगितले जातंय. दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि प्लांटची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन तज्ञांनी केले आहे.

युक्रेनने केलेल्या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्यात नेमके किती नुकसान झाले, याबाबतची माहिती ही पुढे येऊ शकली नाहीये. मात्र, या हल्ल्यानंतर आग लागल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. त्यानंतर रशियाच्या अधिकाऱ्यांनी लगेचच ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केली आणि आग आटोक्यात आली. दुसरीकडे, यामुळे जगात चिंताही वाढत आहे. पाश्चिमात्य देशांना भीती आहे की, जर युद्ध दीर्घकाळ चालू राहिले तर केवळ युरोपच नाही तर संपूर्ण जगाला ऊर्जा संकट, अन्न संकटाचा सामना करावा लागेल.

तज्ञांचे मत आहे की, आता युद्ध फक्त रशिया आणि युक्रेनचा विषय नाही तर संपूर्ण जगाचे आहे. यामुळे दोन्ही देशांनी कोणतेही पाऊल उचलताना पूर्ण विचार करावा. मात्र, युक्रेनने रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर थेट ड्रोन हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. आता तणाव अधिक वाढल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. त्यामध्येच वोलोदिमिर जेलेंस्की यांनी केलेल्या भाषणाने विविध चर्चांना उधाण आलंय.

Follow Us
भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नाही; नेमकं घडतंय काय?
Shivsena Crisis | भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नसल्याची माहिती; नेमकं घडतंय काय?
ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल!
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....